वेकोली अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयावर सीबीआयची धाड; परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:18 IST2023-01-03T12:13:54+5:302023-01-03T12:18:27+5:30
उमरेड वेकोली कार्यालयात जाण्यास मज्जाव

वेकोली अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयावर सीबीआयची धाड; परिसरात खळबळ
उमरेड (नागपूर) : वेकोली उमरेड एरियाच्या अधिकाऱ्याच्या नागपूर येथील निवासस्थानी आणि उमरेड येथील कार्यालयावर आज मंगळवारी सकाळीच सीबीआयने धाड टाकली. एम. पी. नवले असे या वेकोली अधिकाऱ्याचे नाव असून वेकोली उमरेड एरिया येथे प्लॅनिंग ऑफिसर म्हणून नवले कार्यरत आहेत. सीबीआयने धाड मारताच वेकोली अधिकारी, कर्मचाऱ्यांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नवले यांच्याकडे कोळसा खदान प्रकल्पाच्या शेतजमिनीबाबतची असंख्य प्रकरणे आहेत. यात बरेच घबाड असण्याची संभावना असून संपूर्ण कागदपत्रांची तपासणी व चौकशी केली जात आहे. उमरेड वेकोली कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात येत असून सुरक्षा रक्षकांचा पहारा ठेवण्यात आला आहे.