दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही
By admin | Published: March 17, 2015 02:00 AM2015-03-17T02:00:30+5:302015-03-17T02:00:30+5:30
नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली
पाच कोटींचे रस्ते : रिलायन्सचे खोदकाम थांबविले
नागपूर : नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली बैठक पार पडली. तीत दीक्षाभूमी येथे ५० लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची निविदा मंजूर करण्यात आली. सोबतच चार कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश देऊन ८२ लाखांच्या नवीन कामांना मंजुरी देण्यात आली. रिलायन्सने शहरात केलेले खोदकाम थांबविण्याचेही निर्देश देण्यात आले.
दीक्षाभूमी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित काम महापालिकेमार्फत केले जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी मे. टेक्नोकी सोल्युशन यांची १२.६ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. रिलायन्सने ४ जी साठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची दखल घेत रिलायन्सचे सर्व खोदकाम थांबविण्याचे आदेश सिंगारे यांनी बैठकीत दिले. यापूर्वी करण्यात आलेले खोदकाम झोननिहाय बुजविण्यात यावे. सहाय्यक आयुक्तांची याची खातरजमा करावी व त्यानंतरच खोदकाम सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
कन्या शाळेच्या जागेवर
स्पोर्टस् कॉम्प्लेक्स
गांधी कन्या मनपा शाळेच्या जागेवर स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बांधकाम केले जाणार आहे. यासा कामासाठी २ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपयांच्या सुधारित प्रकालनास स्थायी समितीने मंजुरी दिली.