श्रीरामनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 10:24 PM2021-03-10T22:24:18+5:302021-03-11T01:29:02+5:30

नांदगाव : श्रीरामनगर ग्रांमपंचायतीच्या हद्दीत १५ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. घरपट्टी करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत.

CCTV cameras in Shriramnagar | श्रीरामनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

श्रीरामनगरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

googlenewsNext
ठळक मुद्दे माजी सभापती सुमन निकम यांचे मार्गदर्शन.

नांदगाव : श्रीरामनगर ग्रांमपंचायतीच्या हद्दीत १५ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. घरपट्टी करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कॅमेरे खरेदी करण्यात आले आहेत. त्यासाठी पंचायत समिती माजी सभापती सुमन निकम यांचे मार्गदर्शन लाभले. नांदगांव शहरालगत श्रीरामनगर ग्रांमपंचायत असून नागरिकांची सदैव वर्दळ असते. या ग्रांमपंचायत अंतर्गत पेट्रोल पंप, संत जनार्दन स्वामी मंदीर,लहानमोठी दुकाने, शिवाय व्यापार्यांची मालाची गोडाऊन आदीसह मोठी लोकवस्ती आहे.

वीजबिल माफीची मागणी
नांदगाव : कोविड कालावधीतील चार महिन्यांची २०० युनिटपर्यंत वीजबिल माफी, वाढीव वीजदर मागे घेणे व शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे ३०% वीजदर कमी करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे नांदगाव तालुका अध्यक्ष शिवाजी वडघुले यांनी केली आहे.

जातेगाव सोसायटीबाबत तक्रार
नांदगाव : जातेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेत बिगर शेतकरी व्यक्तींना कर्ज वाटप, तसेच महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेत अपात्र कर्जदारांचा कर्ज माफी यादीत समावेश अशा अनेक प्रकरणी सोसायटीचे संचालक, सचिव व सेल्समन यांच्या चौकशीची मागणी सहायक निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांच्याकडे करण्यात आली आहे. शेख नजीर, रमेश चव्हाण, राजेंद्र कदम, देवीदास व्यवहारे, ब्रिजेश चव्हाण, वाल्मीक गायकवाड यांनी याबाबत तक्रार केली. उत्पन्नाचा मार्ग नसताना कर्जवाटप करण्यात आल्याने संस्था थकबाकीत जाऊन सभासदांवर अन्याय होईल, अशी माहिती तक्रारकर्त्यांनी दिली आहे.

Web Title: CCTV cameras in Shriramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.