वृक्षारोपणाने स्वातंत्र्यदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:04+5:302021-08-18T04:12:04+5:30

हिंगणा : तालुक्यातील कान्हाेलीबारा येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षाराेपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक ...

Celebrate Independence Day with tree planting | वृक्षारोपणाने स्वातंत्र्यदिन साजरा

वृक्षारोपणाने स्वातंत्र्यदिन साजरा

Next

हिंगणा : तालुक्यातील कान्हाेलीबारा येथील श्रीकृष्ण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षाराेपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक अशाेक कुकडकर यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्ष लागवड केली. यावेळी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला. ग्रामीण भागातील वृक्षांची घटत असलेली संख्या पाहता, शहरी भागात हाेणारी वृक्ष लागवड याकडे लक्ष वेधण्यात आले.

...

नागपूर तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजाराेहण

वाडी : नागपूर ग्रामीण तालुक्यातील पिपळा (घोगली), सालई (गोधनी), वेळा (हरिश्चंद्र), सुराबर्डी, येरला (गोन्ही), दवलामेटी, खडगाव, लाव्हा, द्रुगधामना ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिपळा (घोगली) गट ग्रामपंचायत येथे सरपंच नरेश भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रभूजी भेंडे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश भोयर, वनिता कावळे, वैशाली पांडे, शकुनबाई वाघ, ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपुरे, मुख्याध्यापक मंडपे, शीतलकुमार मेश्राम तसेच शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सालई (गोधनी) गट ग्रामपंचायतमध्ये सरपंच वर्षा सुनील कोडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसरपंच दिलीप मेंढे, ग्रामसचिव सुधाकर हरले, माजी सरपंच सुनील कोडे, विनोद भुजाडे, प्रकाश कुहीकर, ग्रा.पं. सदस्य लीला पारडकर, छाया करडभाजने, कुंदा मिसाळ, सुवर्णा कानोडे, अनिल बुरिले, चंद्रशेखर बाराहाते, वैद्यकीय अधिकारी लेखा बडोदेकर, तलाठी राऊत उपस्थित होते. वेळा (हरिश्चंद्र) गट ग्रामपंचायत येथे सरपंच सचिन इंगळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसरपंच प्रभाकर काळबांडे, ग्रामसचिव चंद्रशेखर मुंगले, ग्रा.पं. सदस्य व नागरिक उपस्थित होते.

सुराबर्डी येथे सरपंच ईश्वर गणवीर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी ग्रामसचिव मनीष रावत, उपसरपंच मुकेश महाकाळकर, ग्रा.पं. सदस्य सुभाष तायडे, विनोद सोनवणे, भाग्यश्री निकुडे, कविता आंबटकर, सीमा येलेकर, कल्पना राऊत, दीपाली गुरनुले, शेषराव कोहळे उपस्थित होते. येरला (गोन्ही) गट ग्रामपंचायतमध्ये सरपंच माया ठाकरे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपसरपंच प्रमोद गमे, ग्रामसचिव राजू मुरोडिया, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र अखंड, भारती खोब्रागडे, लता कुंभरे, सोनाली बोडे, सविता ठाकूर, वैशाली पेटकर, मंगेश तायवाडे उपस्थित होते.

दवलामेटी ग्रामपंचायत येथे सरपंच रिता उमरेडकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसरपंच प्रशांत केवटे, ग्रामविकास अधिकारी विष्णू पोटभरे, ग्रा.पं. सदस्य गजानन रामेकर, प्रकाश मेश्राम, रश्मी पाटील, छाया खिल्लारे, शकुंतला अभ्यंकर, साधना शेंदरे, शीतल वानखडे, सतीश खोब्रागडे, रक्षा सुखदेवे, अर्चना चौधरी, उज्ज्वला गजभिये, मिथुन गवई, मुख्याध्यापक कमलाकर राऊत व नागरिक उपस्थित होते. लाव्हा ग्रामपंचायत येथे सरपंच ज्योत्स्ना नितनवरे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी विकास लाडे, उपसरपंच महेश चोखांद्रे, माजी पं. स. उपसभापती सुजित नितनवरे, रॉबिन शेलारे, प्रकाश चोखांद्रे, भोजराज पुसाम, जिजा लाखे, सुधीर बाराहाते, पुरुषोत्तम अन्नपुर्णे, पांडुरंग बोरकर, मनोज तभाने, अनिल पाटील, पुरुषोत्तम गोरे, सुनंदा चोखांद्रे, प्रशांत परिपवार, मंजुषा लोखंडे, साधना वानखडे, सुलोचना डोंगरे, सुनीता तडोसे, रेखा पटले, सुशीला ढोक, सुनीता मेश्राम, जया पिचकाटे उपस्थित होते.

खडगाव ग्रामपंचायत येथे सरपंच रेखा मून यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी सरपंच तथा ग्रा. पं. सदस्य देवराव कडू, उपसरपंच किशोर सरोदे, ग्रामसचिव माणिक जाधव, शीतल उईके, सरला कडू, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणुका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे, मनोज कडू, चंद्रशेखर गणवीर, गोपाल ताकीत, गणेश रहांगडाले, दत्तू कडू, प्रशांत डोंगरे उपस्थित होते. द्रुगधामना ग्रामपंचायतमध्ये सरपंच साधना कराळे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसरपंच बंडू गजभिये, दशरथ इटकर, नरेश गजभिये, ताराचंद बोरकर उपस्थित होते.

Web Title: Celebrate Independence Day with tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.