साध्या पद्धतीने हाेळी साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:07 AM2021-03-29T04:07:03+5:302021-03-29T04:07:03+5:30
जलालखेडा : काेराेना संक्रमणाचे संकट विचारात घेता सर्वांनी अत्यंत साध्या पद्धतीने हाेळी व धूलिवंदन साजरे करण्याचे आवाहन जलालखेडा (ता. ...
जलालखेडा : काेराेना संक्रमणाचे संकट विचारात घेता सर्वांनी अत्यंत साध्या पद्धतीने हाेळी व धूलिवंदन साजरे करण्याचे आवाहन जलालखेडा (ता. नरखेड) येथील एस. आर. के. इंडाे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मॅसेजद्वारे नागरिकांना केले आहे.
सध्या राज्यात काेराेना संकट अधिक गडध हाेत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:साेबतच इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे. हाेळी हा माेठा सण असला तरी काेराेनामुळे हा सण मनसाेक्त साजरा करण्यावर निर्बंध आले आहेत. धूलिवंदन एकमेकांना रंग व गुलाल लावून साजरे करण्याची परंपरा आहे. रंग लावताना काेराेना संक्रमण वाढण्यास मदत हाेऊ शकते. काेराेना संक्रमण लक्षात घेता आपल्या भावनांना आवर घालावा. छाेट्यांनी रंग अथवा पाणी न खेळता त्याऐवजी फुलांचा वापर करावा. प्रत्येकाने मास्क लावून घराबाहेर जावे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून एकमेकांना शुभेच्छा द्याव्या, असे आवाहन एस. आर. के. इंडाे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना एक व्हिडिओ क्लिपद्वारे केले आहे. प्राचार्या शुभांगी अर्डक, पर्यवेक्षिका प्रियांका देशमुख यांच्यासह शिक्षक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे काैतुक केले आहे.