महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:08 AM2021-03-10T04:08:03+5:302021-03-10T04:08:03+5:30
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगलो पाहिजे. त्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा असे मत ...
महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जगलो पाहिजे. त्यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा असे मत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांनी व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील कृषी सखी, जिल्हा अभियान कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेली जिल्हा अभियान व्यवस्थापक अप्लना बोस यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हा व्यवस्थापक- विपणन व ज्ञान व्यवस्थापन अमोल बाविस्कर यांनी मानले.
0-0-0-0-
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान ()
जागतिक महिला दिनानिमित्त रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्वीनी महिला मंचच्या अध्यक्ष किरण मुंदडा, जया वानखेडे, डॉ. रिना वाघ, वंदना ज्ञानेश्वर मेश्राम यांचा प्रमाणपत्र तुळशीचे रोप व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महीला समन्वयक सुप्रिया पाटील, वैशाली येलमुले, प्रीती पिल्लेवार, पायस्वी येलमुले, सुधीर पाटील, स्वीकार देशमुख, अभिजित जाधव उपस्थित होते.
- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ()
जागतिक महिला दिनानिमित्त संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष मंगला जाळेकर, प्रमुख पाहुणे अशोक दगडे, ज्ञानेश्वर महल्ले, मेघा कराळे, प्रतिभा सोनारे उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. संचालन कादंबिनी तिरपुडे यांनी केले. प्रस्ताविक मेघा कराळे व आभार वंदना परिहार यांनी मानले. प्रसंगी वंदना परिहार, ज्योती अढाऊ, सुहासिनी टाकरे, मानसी कट्यारमल, पद्मा सलामे, वंदना काकडे, भावना सूर्यवशी, सुनिता कडू, सुलभा गायकवाड, वंदना रायबोले, सुनिता ढोले, यशवंत कडू, नाना कडबे, मनिष किरपाल, बुधाजी सुरकर आदी उपस्थित होते.