आनंद व्यक्त करीत ईद साजरी

By admin | Published: July 30, 2014 01:24 AM2014-07-30T01:24:16+5:302014-07-30T01:24:16+5:30

एकमेकांना शुभेच्छा देत आणि आनंद व्यक्त करीत नागरिकांनी आज ईद साजरी केली. परस्परांना गळ्याशी लावून हा सण नागरिकांनी शांततेत, बंधूभावाने आणि उत्साहात साजरा केला. ईदनिमित्त शहरात

Celebrating the celebration of Eid | आनंद व्यक्त करीत ईद साजरी

आनंद व्यक्त करीत ईद साजरी

Next

गळा भेट घेऊन शुभेच्छा
नागपूर : एकमेकांना शुभेच्छा देत आणि आनंद व्यक्त करीत नागरिकांनी आज ईद साजरी केली. परस्परांना गळ्याशी लावून हा सण नागरिकांनी शांततेत, बंधूभावाने आणि उत्साहात साजरा केला. ईदनिमित्त शहरात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि अल्लाहने दिलेला आनंद परस्परात वाटून सत्य आणि योग्य मार्गावर चालण्याचा संकल्पही केला.
मंगळवारी शहरातील विविध इदगाह, मशीद, मैदानात ईदनिमित्त विशेष नमाजचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संघटनांनी शहरवासीयांना ईदच्या आनंददायी शुभेच्छा दिल्यात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ईदनिमित्त मोमिनपुरा येथे जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्यासह राज्यमंत्री अनिस अहमद, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, आ. विकास कुंभारे, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनीही मोमिनपुऱ्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्यात.
इदगाह बोरियापुरा, मोमिनपुरा जामा मशीद, मुस्लिम फुटबॉल ग्राऊंड मोमिनपुरा, जाफरनगर इदगाह, सदर इदगाह, लाल बिल्डिंग मर्कज, ढावणी मशीद आदींसह शहरात विविध ठिकाणी ईदची विशेष नमाज पढण्यात आली. शहरात सकाळी ७.३० वाजतापासून ईदच्या नमाजला प्रारंभ करण्यात आला. नमाजनंतरचे वातावरण पावित्र्याने भारले होते. आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात याप्रसंगी सर्व नागरिकांनी परस्परांना शुभेच्छा दिल्यात. (प्रतिनिधी)

Web Title: Celebrating the celebration of Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.