नवीन वर्ष, ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताय? सावध व्हा.. सायबर गुन्हेगारांचीही आहे जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 08:33 PM2021-12-24T20:33:07+5:302021-12-24T20:33:50+5:30

Nagpur News ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनच्या तयारीत आहात का.... मग सावधान। जरा जपून बुकिंग करा. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून मोठी रक्कम गमवाल.

Celebrating the New Year, Christmas? Beware .. Cyber criminals are also very prepared | नवीन वर्ष, ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताय? सावध व्हा.. सायबर गुन्हेगारांचीही आहे जोरदार तयारी

नवीन वर्ष, ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताय? सावध व्हा.. सायबर गुन्हेगारांचीही आहे जोरदार तयारी

Next
ठळक मुद्देनामांकित हॉटेल, रेस्टॉरेंटच्या नावाचा गैरवापर

नरेश डोंगरे

नागपूर - ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनच्या तयारीत आहात का.... मग सावधान। जरा जपून बुकिंग करा. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून मोठी रक्कम गमवाल. होय, तुम्ही सेलिब्रेशनची तयारी करत असाल तर सायबर गुन्हेगारांनीही चिटिंगची जोरदार तयारी केली आहे.

थर्टी फर्स्ट, नवीन वर्ष तसेच ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल, रेस्टॉरेंट लाउंजमध्ये जोरदार तयारी केली जाते. डान्स, पार्टी, साग्रसंगित खान-पान असे सेलिब्रेशनचे स्वरूप आणि जेवणासोबत वाईन्स मोफत, दोन कपल्स, फॅमिलीच्या बुकिंगवर एका रात्रीचा स्टे मोफत या आणि अशाच काही आकर्षक ऑफर्सही जाहिर केल्या जातात. सर्वसामान्यांना भूरळ घालणाऱ्या या सेलिब्रेशन ऑफर्सवर सायबर गुन्हेगारांची नजर असते. नामांकित आणि प्रतिष्ठीत हॉटेल - रेस्टॉरेंटचे लोगो वापरून, त्यांच्या नावाचा गैरवापर करून स्वताची लिंक किंवा संपर्क नंबर देतात. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग करताना सावधगिरी बाळगली नाही तर मोठा आर्थिक गंडा घातला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित जाहिरात त्याच प्रतिष्ठानाच्या वेबसाईटवर आहे का, हे तपासून घेण्याची गरज आहे.

सायबर गुन्हेगारांचे फंडे

सोशल प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीत गुगल एडिटचा वापर करतात.

त्यांची जाहिरात (लिंक) क्लिक केल्यास किंवा त्याचा क्यूआर कोड स्कॅन केल्यास तो तुमच्या खात्यात एक रुपया जमा करतो. हा व्यवहार ओके झाल्यास तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम तो काढून घेतो.

ही घ्या काळजी...

आपल्या बँक खात्याची, कोणत्याही कार्डची अथवा व्यक्तिगत माहिती शेअर करू नका

ओटीपी शेअर करू नका

एनी डेस्क, टीम व्यूवर, अशा प्रकारची लॅपटॉप, मोबाईलची स्क्रीन शेअर करणारी अप्लिकेशन डाऊनलोड करू नका.

तात्काळ संपर्क करा

चुकून असे काही झाले तर तात्काळ पोलिसांच्या सायबर शाखेत संपर्क करा. जेवढ्या लवकर सायबर पोलिसांकडे संपर्क केला तितकी जास्त शक्यता आमची रक्कम परत मिळण्याची असते. यात हयगय झाल्यास सायबर गुन्हेगार ती रक्कम लांबवू शकतो.

--------

Web Title: Celebrating the New Year, Christmas? Beware .. Cyber criminals are also very prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.