श्रावण, जन्माष्टमीच्या उत्सवात रमल्या सखी

By admin | Published: September 8, 2015 05:08 AM2015-09-08T05:08:44+5:302015-09-08T05:08:44+5:30

आकाशात ढगांची आणि संत रविदास सभागृहात सखींची गर्दी... काही क्षणात बाहेर पाऊसधारा आणि सभागृहात

Celebrating Shravan, Janmashtami festival | श्रावण, जन्माष्टमीच्या उत्सवात रमल्या सखी

श्रावण, जन्माष्टमीच्या उत्सवात रमल्या सखी

Next

नागपूर : आकाशात ढगांची आणि संत रविदास सभागृहात सखींची गर्दी... काही क्षणात बाहेर पाऊसधारा आणि सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह... एकच जल्लोष! युवती, महिला, वृद्धा साऱ्याच चिंबचिंब...कोणी उखाणे घेण्यात तर कोणी फुगड्या खेळण्यात. कोणी कोडे सोडविण्यात तर कोणी हर्बल पावडरच्या रंगात. निमित्त होते, लोकमत सखी मंच आणि रुपसी नॅचरल हर्बल पावडर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रावण उत्सवा’चे. या कार्यक्रमाला सखींनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात, राधा-कृष्ण फॅन्सी ड्रेस स्पर्धेने झाली. यात लहान मुलामुलींनी राधा आणि कृष्णाची वेशभूषा केली होती. ही मुले मंचावर येताच ‘अरे वा!’, ‘किती छान!’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांतून आल्या. सभागृहात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. या स्पर्धेनंतर ‘श्रावण सखी फॅशन शो’ स्पर्धा झाली. या स्पर्धेत श्रावणात मिळणारी फळे, भाज्या, फुले यांचा साज करीत सखी रॅम्पवर चालल्या. ही स्पर्धा ‘श्रावण उत्सवा’चे आकर्षण ठरले.
दरम्यान, ‘रुपसी’च्या संचालिका मल्लिका सोमकुंवर यांनी आपले उत्पादन ‘रुपसी नॅचरल हर्बल पावडर’ची माहिती दिली. त्या म्हणाल्या, हे पावडर फेसवॉशसारखे काम करते.
इतर आयुर्वेदिक उत्पादनाच्या तुलनेत हे वेगळे आणि प्रभावी काम करणारे आहे. या पावडरमुळे त्वचा तर स्वच्छ होते सोबतच त्वचेला पोषणही मिळते. यात डाळ, चंदन आणि विविध १७ प्रकाराच्या जडीबुटी आहेत.
त्यांनी मंचावर याचे प्रात्यक्षिकही दिले. या पावडरमुळे चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखालील काळेपणा निघून जातो व चेहरा उजळतो. (प्रतिनिधी)
सभागृहात दरवळला व्यंजनांचा सुवास
या उत्सवात व्यंजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी झालेल्या सखींनी घरून तयार केलेले स्वादिष्ट व्यंजन आणले होते. गोड-तिखट खाद्यपदार्थांचा सुवास संपूर्ण सभागृहात दरवळला होता. यात अनेक नवीन व्यंजनही सादर करण्यात आले. कार्यक्रमात मधे मधे नृत्यही सादर करण्यात आले. शादिया गवई यांचा ‘झुमका गिरा रे’ नृत्य धमाकेदार राहिले.
‘फुगडी स्पर्धे’ने कार्यक्रमात आणली रंगत
कार्यक्रमाच्या शेवटी ‘फुगडी स्पर्धा’ घेण्यात आली. यात आपल्या जोडीदारासोबत अनेकांनी फुगडी खेळली. जास्तीतजास्त वेळपर्यंत फुगडी खेळणाऱ्या जोडीला पुरस्कार देण्यात आले. यात अनेक जणी पडल्या, दमल्या तरी त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. स्पर्धेचे परीक्षण शालिनी मानापुरे, वैदेही चवरे, वैशाली ढवळे यांनी केले. प्रास्ताविक रोशनी शेगावकर यांनी केले. संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी आणि आर.जे. प्रमेय यांनी केले. मधु ब्युटी पार्लरच्यावतीने माधुरी चौरसिया यांनी उपस्थित सखींना ३०० रुपयांचे ‘फ्रूट फेशियल’चे कूपन भेटस्वरूपात दिले. उत्सवादरम्यान ‘वन मिनट गेम शो’ खेळून भेटवस्तूही देण्यात आल्या. या कार्यक्रमाला संत रविदास सभागृहाचे विशेष सहकार्य मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिवेणी कायंदे, अरुणा शेंडे, मंगेश चरडे, पोलुस लाल आणि सर्व विभाग प्रतिनिधींनी सहकार्य केले.
गोपालकाल्याचे वितरण
४श्रावण उत्सवादरम्यान ‘लोकमत सखी मंच’ विभाग प्रतिनिधी आणि सखींनी मिळून दहीहंडी फोडली. गोपालकाल्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सखींनी सामूहिक नृत्यही सादर केले.
विविध स्पर्धेतील विजेते
४राधाकृष्ण फॅन्सी ड्रेस स्पर्धा : अनन्या ताजनेकर, तन्मया थूल, वृषाली शेंडे, दर्श जगताप, शिवम् लाांजेवार या विजेत्या स्पर्धकांना एकसारखा पुरस्कार देण्यात आला.
४श्रावण सखी स्पर्धा : प्रथम - अर्चना पगाडे, द्वितीय - विमल सावरकर, तृतीय शीतल बेलेकर.
४व्यंजन स्पर्धा : प्रथम -दुर्गा मरीचे,द्वितीय - रोहिणी देशकर, मीना श्रीवास्तव.
४फुगडी स्पर्धा : प्रथम - वीणा वंजारी, द्वितीय - स्नेहा सालगुंजेवार.

Web Title: Celebrating Shravan, Janmashtami festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.