टीम इंडियाच्या विजयाचा उपराजधानीत जल्लोष : फटाके फोडून झाले सेलिब्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:08 AM2019-03-06T00:08:31+5:302019-03-06T00:11:35+5:30

‘किंग कोहली’ची धडाडलेली ‘रनमशीन’, माहीचे ‘ऑलवेज कूल’ व्यवस्थापन, जसप्रीतने दिलेली ‘टशन’, कुलदीप यादवच्या फिरकीची ‘जादू’... कांगारूंच्या विरोधात ‘टीम इंडिया’चा ‘परफॉर्मन्स’ प्रत्यक्ष ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची मिळालेली संधी अन् अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यातील दिमाखदार विजय. नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी तर मंगळवार हा ‘फुल्ल ऑन’ ‘क्रिकेट डे’च ठरला. कोहलीचे शतक अन् विजयाचा धमाका यांचा योग आल्याने तर क्या कहने! भारताचा विजय झाला अन् संत्रानगरीने आपल्या ‘स्टाईल’ने ‘सेलिब्रेशन’ला सुरुवात केली.

Celebrating the victory of team India: Celebrations broke through fireworks | टीम इंडियाच्या विजयाचा उपराजधानीत जल्लोष : फटाके फोडून झाले सेलिब्रेशन

टीम इंडियाच्या विजयाचा उपराजधानीत जल्लोष : फटाके फोडून झाले सेलिब्रेशन

Next
ठळक मुद्दे‘किंग कोहली’च्या कारनाम्याने क्रिकेटप्रेमी ‘क्रेझी’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘किंग कोहली’ची धडाडलेली ‘रनमशीन’, माहीचे ‘ऑलवेज कूल’ व्यवस्थापन, जसप्रीतने दिलेली ‘टशन’, कुलदीप यादवच्या फिरकीची ‘जादू’... कांगारूंच्या विरोधात ‘टीम इंडिया’चा ‘परफॉर्मन्स’ प्रत्यक्ष ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची मिळालेली संधी अन् अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्यातील दिमाखदार विजय. नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी तर मंगळवार हा ‘फुल्ल ऑन’ ‘क्रिकेट डे’च ठरला. कोहलीचे शतक अन् विजयाचा धमाका यांचा योग आल्याने तर क्या कहने! भारताचा विजय झाला अन् संत्रानगरीने आपल्या ‘स्टाईल’ने ‘सेलिब्रेशन’ला सुरुवात केली.
नागपुरात क्रिकेट सामना होणार असल्याने क्रिकेटप्रेमींसोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्येदेखील प्रचंड उत्सुकता होती. येता-जाता प्रत्येक जण ‘भाई स्कोअर क्या हुआ’ अशीच विचारणा करीत होता. अनेक जण तनाने कार्यालयांत होते, मात्र मनाने दिवसभर ‘जामठा’ येथेच होते. जे प्रत्यक्ष मैदानावर जाऊ शकले नाही त्यांच्यापैकी अनेक जण सायंकाळनंतर विविध ठिकाणी एकत्रित आले व क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या सामन्याचा आनंद लुटला. अखेरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजय शंकरने ‘ऑसी’ अ‍ॅडम झाम्पाचा त्रिफळा उडविला अन् शहरात एकच जल्लोषाला सुरुवात झाली. धरमपेठ, सदर, सीताबर्डी, रेशीमबाग, वर्धमाननगर, प्रतापनगर, फुटाळा इत्यादी ठिकाणी फटाके फोडून विजयाचे स्वागत करण्यात आले. याशिवाय तरुणाईच्या कट्ट्यांवरदेखील जोरदार ‘सेलिब्रेशन’ झाल्याचे दिसून आले.
नागपूर झाले ‘क्रिकेटमय’
विश्वचषकाच्या उंबरठ्यावर होत असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियाच्या सामन्याबद्दल नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मंगळवारी कामाचा दिवस असला तरी अनेक जणांनी सुटी टाकून थेट ‘जामठा’ गाठले. यात महाविद्यालयीन तरुण, तरुणींचादेखील मोठ्या प्रमाणावर समावेश होता. सामन्याच्या दोन तासअगोदरपासूनच वर्धा मार्गाकडे जाणाऱ्या मार्गांवर ‘ब्ल्यू फिल’ दिसून येत होता. विविध पद्धतीने खेळाडूंना ‘चिअर अप’ करण्यासाठी चाहते ‘पोस्टर्स’, विग्ज, कॅप्स इत्यादी घेऊन मैदानाजवळ पोहोचले. ‘सोशल मीडिया’ वरदेखील नागपूरकर तरुणाई ‘क्रिकेटमय’ झाली होती.

 

 

 

Web Title: Celebrating the victory of team India: Celebrations broke through fireworks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.