संस्कृतभारतीतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:11+5:302021-07-27T04:09:11+5:30

नागपूर : संस्कृतभारती नागपूर महानगरच्यावतीने ऑनलाईन माध्यमातून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मोहन खेडकर हे ...

Celebration of Gurupourni by Sanskritbharati | संस्कृतभारतीतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

संस्कृतभारतीतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Next

नागपूर : संस्कृतभारती नागपूर महानगरच्यावतीने ऑनलाईन माध्यमातून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मोहन खेडकर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून बंगाल येथील रामकृष्ण मिशन, विवेकानंद शोधसंस्थानचे डॉ.शंतनु अयाचित हे होते. भगवान दत्तात्रेयांचे २४ गुरु कथामाध्यमातून त्यांनी प्रदर्शित करून मार्गदर्शन केले. यावेळी स्वाती जोशी, प्रशांत कुलकर्णी, आभा पाठक, प्रीती महोदया, स्वाती डबीर, वसुंधरा महोदया, संध्या मुळे, माधवी बांडे, विद्या आळशी, स्वाती सुळे, अलका बोंडे, माधुरी कोलते, सोनाली नाईक, श्रीया डोके, जानकी कुलकर्णी यांनी वैविध्यपूर्ण प्रस्तुती सादर केल्या. त्यात गुरुवंदना, गुरु-शिष्यपरंपरा प्रदर्शित करणारी लघुनाटिका, पारंपरिक आणि आधुनिक शिक्षापध्दती मधील अंतर यावर नाटिका, गुरुमहिमागायन, नृत्य प्रस्तुती यांचा समावेश होता. सागरिका व नव्या यांनी संचालन केले. महानगरमंत्री डॉ.संभाजी पाटील यांनी संचालन केले, तर विनया बोधनकर यांनी आभार मानले.

Web Title: Celebration of Gurupourni by Sanskritbharati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.