नागपूरच्या दीक्षाभूमीवर जागतिक बौद्ध संस्कृतीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 10:48 PM2018-02-08T22:48:51+5:302018-02-08T22:52:03+5:30

नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Celebration of World Buddhist Culture on the Diksha Bhoomi at Nagpur | नागपूरच्या दीक्षाभूमीवर जागतिक बौद्ध संस्कृतीचा उत्सव

नागपूरच्या दीक्षाभूमीवर जागतिक बौद्ध संस्कृतीचा उत्सव

Next
ठळक मुद्देबुद्ध महोत्सव १७ पासून : कला, चित्रपट व वैचारिक प्रबोधनाची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत चालणाºया या महोत्सवात बौद्ध कला, संस्कृती आणि समृद्ध परंपरेचा अविस्मरणीय उत्सव पाहायला मिळेल. तसेच संगीत कला, चित्रपट व वैचारिक प्रबोधनाची मेजवानीही नागपूरकर रसिकांना मिळेल.
१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चित्रपट महोत्सवाने बुद्ध महोत्सवाची सुरुवात होईल. १८ तारखेला दुपारी ३ वाजता जपान देशात नोकरीच्या संधी या विषयावर कार्यशाळा होईल. १९ व २० तारखेला दुपारी ३ ते रत्री १० वाजेपर्यंत चित्रपटांचे प्रदर्शन होईल. २१ फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन, त्याच दिवशी बुद्ध महोत्सवाचे थीम साँग सादर केले जाईल. शेख अहिनोद्दीन (बासरी) व त्यांची चमू संगीताचा कार्यक्रम सादर करतील. अ‍ॅलन सेनाउके यांचे (अमेरिका) गिटारवादन होईल. यानंतर विभावरी गजभिये आणि त्यांची चमू नृत्य सादर करतील.
२२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता यूपीएससी परीक्षेत यश संपादन यावर कार्यशाळा होईल. त्यानंतर रत्नावली व्याख्यानमालेला सुरुवात होईल. धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे प्रतित्य समुत्पाद (कार्यकारण भाव) यावर मार्गदर्शन करतील. मृणाल थूलकर यांचे भरतनाट्यम् होईल. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलतर्फे नृत्य सादर करण्यात येईल. अरुणाचल प्रदेशच्या चमूचे गीत गायन व बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतिगृहातील विद्यार्थिनी नृत्य सादर करतील. २३ फेब्रुवारीला मिशन इंटरप्रीनरशिप यावर कार्यशाळा होईल. यानंतर सायंकाळी भारतीय व पाश्चिमात्य संगीताचे ‘फ्युजन’ होईल. २४ तारखेला चायनीज व्यायाम कला चि कुंग ही सर्वांकरिता राहील. २५ तारखेला बुद्ध महोत्सवाचा समारोप होईल.

Web Title: Celebration of World Buddhist Culture on the Diksha Bhoomi at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.