टीडब्ल्यूटी तंत्रज्ञानाद्वारे नागपुरात बांधताहेत सिमेंट रस्ता ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:06+5:302021-07-14T04:10:06+5:30
अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी) या तंत्रज्ञानाचा वापर नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हिंगणा रोडवर टीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीम ...
अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग (टीडब्ल्यूटी) या तंत्रज्ञानाचा वापर
नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हिंगणा रोडवर टीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीम व्हाईट टॉपिंग) या तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर १८० मि.मी. जाडीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत होऊन बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
टीडब्ल्यूटी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हिंगणा टी-पॉईंट ते प्रियदर्शनीपर्यंत १३.८५ किलोमीटर लांबीचा सिमेंट रस्ता जागतिक बँक प्रकल्प विभागातर्फे बांधण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाची पाहणी केंद्रीय मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, मुंबईच्या साकेत शहा व पारेख या कंत्राटदार कंपनीतर्फे राजनारायण जैस्वाल यावेळी उपस्थित होते.
रस्त्याची वैशिष्ट्ये
- या रस्त्यावर १२८ कोटी २८ लाख रुपये खर्च होणार आहे.
- १० मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.
- बांधकामासाठी २४ महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, सप्टेंबर २०२१ पर्यंत बांधकाम पूर्ण केले जाईल.
- या रस्त्यावर पातळ काँक्रिटच्या म्हणजेच १८०० मि.मी. जाडीचा वापर करण्यात येणार आहे.
- याला आयआरसीची मान्यता आहे.