‘बुध्दिस्ट सर्कीट’साठी केंद्र देणार १०० कोटी

By Admin | Published: September 8, 2016 02:22 AM2016-09-08T02:22:10+5:302016-09-08T02:22:10+5:30

दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली या भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावित असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी

Center will provide 100 crores for 'Buddhist Circuit' | ‘बुध्दिस्ट सर्कीट’साठी केंद्र देणार १०० कोटी

‘बुध्दिस्ट सर्कीट’साठी केंद्र देणार १०० कोटी

googlenewsNext

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत दिल्लीत बैठक : केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री महेश शर्मा यांची माहिती
नागपूर : दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली या भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावित असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेतून १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली. परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत बुध्दिस्ट सर्कीट संदर्भात बैठक झाली.


‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत निधी
नागपूर : दिल्ली येथे झालेल्या बैठकीला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले नागपुरातील दीक्षाभूमी हे ठिकाण, जपानी स्थापत्य शैलीवर आधारीत नागपूर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागपूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिचोली यांना जोडण्यासाठी बुध्दीस्ट सर्कीट उभारण्यात येणार आहे.
नागपुरात देश-विदेशातून येणारे पर्यटक व बुध्द धम्माचे अनुयायी यांना दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोलीला सुलभरीत्या भेट देता यावी यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.
बुध्दीस्ट सर्कीटसाठी राज्य सरकार आर्थिक मदत करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी, अशी मागणी यावेळी राज्यशासनाच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. महेश शर्मा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेंतर्गत बुध्दिस्ट सर्कीटसाठी १०० कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.(प्रतिनिधी)

Web Title: Center will provide 100 crores for 'Buddhist Circuit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.