उपराजधानीला केंद्राचे ‘अमृत’

By admin | Published: October 1, 2015 03:12 AM2015-10-01T03:12:16+5:302015-10-01T03:12:16+5:30

जेएनएनयूआरएम योजना बंद करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अटल मिशन फॉर रिझ्युव्हनेशन अ‍ॅण्ड अर्बन ...

Center's 'nectar' | उपराजधानीला केंद्राचे ‘अमृत’

उपराजधानीला केंद्राचे ‘अमृत’

Next

स्मार्ट सिटीला बूस्ट : कें द्र व राज्याकडून मिळणार निधी
नागपूर : जेएनएनयूआरएम योजना बंद करून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘अटल मिशन फॉर रिझ्युव्हनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’ (अमृत) अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यात नागपूर शहराचा समावेश केल्याने केंद्र व राज्य सरकारकडून शहरातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण व सार्वजनिक वाहतूक सेवा अशा मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा निर्णय स्मार्ट सिटीच्या विकासासाठी अमृत ठरणार आहे.
जेएनएनयूआरएम योजना बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात या योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून निधी मिळालेला नाही. केंद्र सरकारकडून २७० कोटींचा निधी न मिळाल्याने महापालिकेचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत. परंतु आता प्रलंबित प्रकल्पासाठी अमृत अभियानाच्या माध्यमातून निधी प्राप्त होणार आहे. अमृत योजनेत एकतृतीयांश निधी केंद्र सरकार देणार असून, उर्वरित खर्चाची तरतूद राज्य सरकार व मनपाला करावी लागणार आहे. स्मार्ट सिटी व अमृत योजनेच्या नियम व अटींमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना असल्याने, या विकास योजना राबविणे सोयीचे होणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Center's 'nectar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.