नागपूरसाठी केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद भूषण पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 12:42 AM2019-04-04T00:42:49+5:302019-04-04T00:44:18+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून अरविंद भूषण पांडे यांची नियुक्ती केली आहे. पांडे यांनी नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
केंद्रीय निवडणूक पोलीस निरीक्षक अरविंद पांडे हे उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील २५ बटालियनचे कमांडंट असून, २००९ या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. नागपूर लोकसभा मतदार संघातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मतदारांची गाऱ्हाणे रविभवन येथे कॉटेज क्रमांक-१ येथे स्वीकारतील. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०२२२०३९३५ आहे. ते जनतेसाठी तसेच राजकीय पक्ष, उमेदवार अथवा उमेदवारांच्या
प्रतिनिधीसाठी रविभवन येथे सकाळी ११ ते १ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत उपलब्ध राहतील.