नागपुरातील खुर्सापार पॅटर्नचे केंद्र सरकारकडून कौतुक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:35+5:302021-05-18T04:07:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाने कोविडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायत ...

Central government appreciates Khursapar pattern in Nagpur () | नागपुरातील खुर्सापार पॅटर्नचे केंद्र सरकारकडून कौतुक ()

नागपुरातील खुर्सापार पॅटर्नचे केंद्र सरकारकडून कौतुक ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाने कोविडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागातर्फे प्रकाशित पुस्तिकेत नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खुर्सापार या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.

‘बेस्ट प्रॅक्टीसेस टु फाईट कोविड-१९ बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत राज्यातील ६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यासाठी केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा यात उल्लेख आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीने कोरोनापासून गावाचे संरक्षण कसे केले, याची सविस्तर माहिती आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गतवर्षी २४ मार्च २०२०पासूनच कोविड -१९विषयी शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी जनजागृती व लोकसहभागातून ग्रामपंचायत खुर्सापारने मोठ्या प्रमाणात अभियान राबवले. यामध्ये गावातील युवक व महिलांची प्रभागनिहाय कोविड योद्धा म्हणून नियुक्ती केली. लोकसहभागातून शासकीय व सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन लावण्यात आल्या. तसेच शासनाने लावलेल्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होण्याकरिता गावातील मुख्य रस्ते व चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.

गावात व बाहेरील गावातील लोकांच्या प्रवेशावर लक्ष ठेवून त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंधने घालण्यात आली. गावात ध्वनीप्रक्षेपण यंत्रणेव्दारे दिवसभरातून कोरोनाविषयक संदेश, विविध ध्वनीफीत व डॉक्टरांचे मनोगत याद्वारे जनजागृती करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता यावर अधिक भर देण्यात आला.

गावामध्ये असलेल्या होमगार्डना लोकवर्गणीतून थोडेफार मानधन देऊन, गावात प्रवेश करणाऱ्या लोकांना कोविडसंदर्भात सूचना व मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले. दर महिन्याला गावात क्लोरिन फवारणी व धुरळणी करण्यात आली. गावकरी, युवक मंडळे, आरोग्य, शिक्षण व इतर, कृषी व इतर कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने कोरोनाला दूर ठेवण्यास मदत झाली.

Web Title: Central government appreciates Khursapar pattern in Nagpur ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.