शांतिवनाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:09 AM2021-02-25T04:09:15+5:302021-02-25T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शांतिवन चिचोली येथे साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शांतिवन चिचोली येथे साकारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असून याच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही, असा विश्वास दिल्ली येथील डॉ. आंबेडकर फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी व्यक्त केला. शांतिवन चिचोलीतील विकास कामाची पाहणी करण्यासाठी ते आले असता बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबतच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, भाजपचे प्रदेश सचिव सतीश सिरसवान, राजेश हाथीबेड, अंबादास उके, राहुल झांबरे, रोहन चांदेकर, धनंजय कांबळे आणि सुरेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम चिचोलीचे कार्यवाह संजय पाटील यांनी मेंढे व पारधी यांच्यासह सर्व उपस्थितांचे स्वागत केले. त्यांना येथील विकास कामाची माहिती दिली. केंद्र सरकारतर्फे नुकतेच साडेचार कोटी रुपये शांतिवनासाठी आले आहेत. यासंदर्भातही माहिती देण्यात आली. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध केला जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.