नवीन १५० ई-बसेसला केंद्र सरकारची मान्यता

By गणेश हुड | Published: February 12, 2024 08:48 PM2024-02-12T20:48:32+5:302024-02-12T20:48:41+5:30

‘पीएम ई-बस’ योजनेतून आपली बस सेवेसाठी दोन चार्जिंग डेपोलाही मंजुरी.

Central Govt approves new 150 e buses | नवीन १५० ई-बसेसला केंद्र सरकारची मान्यता

नवीन १५० ई-बसेसला केंद्र सरकारची मान्यता

नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने पीएम ई-बस योजनेंतर्गत नागपूर शहराच्या परिवहन सेवेसाठी महापालिकेला १५० ई-बसेस देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे आता मनपाच्या ‘आपली बस’ सेवेत लवकरच १५० ई-बसेस दाखल होणार आहेत. सोबतच अद्ययावत दोन चार्जिंग डेपोला मंजुरी दिली आहे. ई -बसेस  प्राप्त व्हाव्यात यासाठी मनपाने प्रस्ताव पाठविला होता.

देशातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा व शहरी वाहतुक व्यवस्थेला चालना देण्याकरिता पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक ‘पीएम ई-बसेस योजना’ राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. या योजनेंतर्गत केंद्राद्वारे देशभरात १० हजार ई-बसेस दिल्या जाणार आहेत.  केंद्र सरकारला प्राप्त झालेल्या प्रस्तावाअंतर्गत ई-बस आणि बिहाईंड-द-मीटर पॉवर या पायाभूत सुविधांच्या विकास प्रस्तावांना केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ई-बसेसचा प्रस्ताव पाठविला होता. अशी माहिती परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी  रवींद्र पागे यांनी दिली.

Web Title: Central Govt approves new 150 e buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर