लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेची ५२.२८ दशलक्ष टन माल वाहतूक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:10 AM2021-02-18T04:10:33+5:302021-02-18T04:10:33+5:30
कोरोनात लॉकडाऊन असूनही मध्य रेल्वेने मालगाड्यांची वाहतूक सुरू ठेवली. मध्य रेल्वेने आपल्या क्षेत्रात विविध गरजा भागविण्यासाठी यशस्वीरीत्या माल वाहतूक ...
कोरोनात लॉकडाऊन असूनही मध्य रेल्वेने मालगाड्यांची वाहतूक सुरू ठेवली. मध्य रेल्वेने आपल्या क्षेत्रात विविध गरजा भागविण्यासाठी यशस्वीरीत्या माल वाहतूक केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी १.२७ टन अन्नधान्य व साखर निर्यात केली. तसेच २.८५ टन खते आणि ५ लाख टन कांद्याची वाहतूक केली. तसेच ४.४५ दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादने, १.५९ दशलक्ष टन लोह आणि स्टील, ४.४७ दशलक्ष टन सिमेंट, ८.१५ दशलक्ष टन कंटेनर वॅगन्स आणि २.९१ दशलक्ष टन डी-ऑइल केक आणि इतर वस्तूंची वाहतूक करण्यात आली. यात नागपूर विभागाने २८.०८ दशलक्ष टन, मुंबई विभागाने १३.९१ दशलक्ष टन, भुसावळ विभागाने ४.८८ दशलक्ष टन, सोलापूर विभागाने ४.३६ दशलक्ष टन आणि पुणे विभागाने १.०३ दशलक्ष टन माल वाहतूक केली आहे.
...........