मध्य रेल्वे : मुंबई, नाशिकसाठी विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:39 PM2020-02-11T22:39:05+5:302020-02-11T22:40:32+5:30
मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता मुंबईकरिता तीन तर, नाशिकसाठी दोन विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईकरिता ०२०३२ क्रमांकाची रेल्वे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथून प्रस्थान करून वर्धा येथे दुपारी ४.२८, धामनगाव येथे सायंकाळी ५.०५, बडनेरा येथे सायंकाळी ६.४८, मूर्तीजापूर येथे रात्री ७.१८, अकोला येथे रात्री ७.४८, शेगाव येथे रात्री ८.१८, मलकापूर येथे रात्री ८.५५, भुसावळ येथे रात्री १०, नाशिक येथे मध्यरात्रीनंतर १.१८, ईगतपुरी येथे २.५५, कल्याण येथे पहाटे ४.५०, ठाणे येथे सकाळी ५.१५, दादर येथे सकाळी ५.४८ तर, मुंबई येथे सकाळी ६.१५ वाजता पोहचेल.
१५ व १८ फेब्रुवारी रोजी ०२०३१ क्रमांकाची रेल्वे मुंबई येथून रात्री १२.२० वाजता प्रस्थान करून दादर येथे रात्री १२.३३, ठाणे येथे मध्यरात्रीनंतर १.०५, कल्याण येथे १.३२ ईगतपुरी येथे पहाटे ३.३०, नाशिक येथे पहाटे ४.२५, भुसावल येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल.
नाशिकसाठी १५ फेब्रुवारी रोजी ०२०३४ क्रमांकाची रेल्वे नागपूर येथून दुपारी ४ वाजता प्रस्थान करून वर्धा येथे सायंकाळी ५.११, धामनगाव येथे सायंकाळी ६.०५, बडनेरा येथे रात्री ७.३२, मूर्तीजापूर येथे रात्री ८.०८, अकोला येथे रात्री ८.५०, शेगाव येथे रात्री ९.१८, मलकापूर येथे रात्री ९.५५, भुसावळ येथे रात्री ११.३०, मनमाड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.२८ तर, नाशिक येथे पहाटे ४ वाजता पोहचेल.
१६ फेब्रुवारी रोजी ०२०३३ ही गाडी नाशिक येथून पहाटे ४.३० वाजता प्रस्थान करून मनमाड येथे सकाळी ५.२५, भुसावळ येथे सकाळी ७.४५, मलकापूर येथे सकाळी ८.३३, शेगाव येथे सकाळी ९.०८, अकोला येथे सकाळी ९.२३, मूर्तीजापूर येथे सकाळी ९.५५, बडनेरा येथे सकाळी ११.०३, धामनगाव येथे सकाळी ११.४०, वर्धा येथे दुपारी १२.२८ तर, नागपूर येथे दुपारी २.१० वाजता पोहचेल. या सर्व गाड्यांना १५ शयनयान व २ एसएलआर डबे राहतील.
सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन वातानुकुलित कोच
प्रवाशांच्या सुविधेकरिता सिकंदराबाद-दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेसला दोन तृतीय श्रेणी वातानुकुलित कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोचची संख्या वाढून २३ होणार आहे. पूर्वी ही संख्या २१ होती.