मध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:49 AM2020-01-23T00:49:31+5:302020-01-23T00:50:38+5:30

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २१ जानेवारीला एकाच दिवशी ३९ रॅकसोबत १९९१ वॅगनची माल वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे.

Central Railway transport of 1991 wagons in one day, income of 9.3 crores | मध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेची एका दिवसात १९९१ वॅगनची वाहतूक , ९.३ कोटींचे उत्पन्न

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २१ जानेवारीला एकाच दिवशी ३९ रॅकसोबत १९९१ वॅगनची माल वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. यासोबतच आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये विभागाने माल वाहतुकीच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यामुळे विभागाला एकाच दिवशी ९.३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न २६ नोव्हेंबर २०१९ च्या ३४ रॅक आणि १८७९ वॅगनची वाहतुक तसेच ७ डिसेंबर २०१९ च्या ३५ रॅकच्या तुलनेत सर्वाधिक आहे. याशिवाय विभागाने सर्वाधिक ९४ टक्के वेळेचे पालन केले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, विभागीय परिचालन व्यवस्थापक सुमित बदरके, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे ही मालवाहतूक करण्यात आली आहे.

Web Title: Central Railway transport of 1991 wagons in one day, income of 9.3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे