पुणे- अजनी - पुणेसह मध्य रेल्वे चालविणार ३६ स्पेशल ट्रेन

By नरेश डोंगरे | Published: November 17, 2023 09:34 PM2023-11-17T21:34:57+5:302023-11-17T21:35:10+5:30

या गाड्याही देणार प्रवाशांना सेवा

Central Railway will run 36 special trains including Pune-Ajni-Pune | पुणे- अजनी - पुणेसह मध्य रेल्वे चालविणार ३६ स्पेशल ट्रेन

पुणे- अजनी - पुणेसह मध्य रेल्वे चालविणार ३६ स्पेशल ट्रेन

नागपूर: मध्य रेल्वेने पुणे-अजनी-पुणे सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीसह ३६ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांना चांगला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

०१४६५ सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल पुणे येथून २६ डिसेंबर आणि २ जानेवारीला दुपारी ३.१५ वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी अजनी नागपूर स्थानकावर पहाटे ४.५० वाजता पोहचणार आहे. तर, ०१४६६ सुपरफास्ट विशेष अजनी, नागपूर स्थानकावरून २७ डिसेंबर तसेच ३ जानेवारीला रात्री ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुणे येथे पोहचेल.

या दोन्ही गाड्या मार्गातील दाैंड, दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबतील आणि प्रवाशांची ने-आण करतील. गाडीमध्ये एकूण २२ कोच राहणार असून त्यातील तीन एसी टू टियर, १५ थर्ड एसी आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश आहे.

या गाड्याही देणार प्रवाशांना सेवा
या शिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - थिवि - मुंबई, पुणे- करमळी -पुणे, पनवेल-करमळी-पनवेल या गाड्याही प्रवाशांना सेवा देणार आहेत.

 

Web Title: Central Railway will run 36 special trains including Pune-Ajni-Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.