मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, कोल्हापूर एकेरी विशेष गाडी चालवणार!

By नरेश डोंगरे | Published: February 16, 2024 03:42 PM2024-02-16T15:42:46+5:302024-02-16T15:43:22+5:30

मुंबई-नागपूर अतिजलद वन वे विशेष मुंबई येथून सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ३.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल. 

Central Railway will run one-way special train from Mumbai to Nagpur, Kolhapur! | मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, कोल्हापूर एकेरी विशेष गाडी चालवणार!

मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर, कोल्हापूर एकेरी विशेष गाडी चालवणार!

नागपूर : मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर विशेष शुल्कावर २ एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर अतिजलद वन वे विशेष मुंबई येथून सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ३.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल. 

थांबे : ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा स्थानकावर थांबेल. 

त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कोल्हापूर वन वे विशेष अतिजलद ०१०९९ ही एकेरी विशेष गाडी मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. 

दरम्यान,  दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर या ठिकाणी ही गाडी थांबणार आहे. गाडी क्रमांक ०२१०३ आणि ०१०९९ साठी १७ आईसीएफ कोच, एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लास कोच राहतील. 

Web Title: Central Railway will run one-way special train from Mumbai to Nagpur, Kolhapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे