केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 10:49 PM2019-11-22T22:49:26+5:302019-11-22T22:50:34+5:30

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.

The Central team will conduct surveillance of three villages in Bhiwapur taluka | केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी

केंद्राचे पथक भिवापूर तालुक्यातील तीन गावांची करणार पाहणी

Next
ठळक मुद्देसोमवारी देणार भेटी 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी जिल्ह्यात दाखल होणार असून ते भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करणार असल्याची माहिती आहे.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार ३५५ शेतकऱ्यांचे ५४ हजार २०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यासाठी ४८ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविण्यात आला. शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिला टप्प्यात १३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्य शासनाने मदतीसाठी केंद्र सरकारकडे १० हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे.
त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे चार पथक राज्यात दाखल झाले आहे. एक पथक विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवार २२ तारखेलाच दाखल झाले. हे पथक सोमवारी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास हे पथक नागपूर जिल्ह्यात दाखल होणार असून भिवापूर तालुक्यातील तीन गावांची पाहणी करतील. नक्षीवडद, सानेगाव व भिवापूर या तीन गावांना ते भेटी देतील, असे सांगितले जाते.

Web Title: The Central team will conduct surveillance of three villages in Bhiwapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.