केंद्राची राज्याला सापत्न वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 02:40 PM2020-11-18T14:40:39+5:302020-11-18T14:41:04+5:30
Vijay Wadettiwar Nagpur News केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, या वर्षी महाराष्ट्रावर सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती आली. अडचण असतानाही शेतकऱयांना मदत केली. पुरपरिस्थितीसाठी तीन वेळा केंद्राला पत्र लिहिले, 750 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला परंतु एक रुपयांची मदत केली नाही, इतकेच नव्हे तर आमचे हक्काचे जीएस्टीचे 38 हजार कोटी रुपये अजूनही येणे आहे. राज्यातील विरोधी पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करीत आहे.
राज्यातील भाजपच्या वजनदार नेत्यांनी केंद्रात आपले वजन वापरून राज्याचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे, मदतीसाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारने केली शेतकऱयांची फसवणूक
पीएम किसन सन्मान निधी अंतर्गत केवळ 22 टक्के लोकांच्या खत्यातच 6 हजार रुपये जमा, 88 टक्के शेतकऱयांना अजूनही पैसे मिळाले नाही, यातही केवळ आयकर रिटर्न फॉर्म भरले म्हणून पैसे परत घेन्यात आले, ही शेतकऱयांची शुद्ध फसवणूक आहे.