कोरोना योद्ध्यांची रक्तदानातही सेंच्युरी()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:45+5:302021-07-10T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नात’ रक्तसंकलन महायज्ञात कोविड काळात जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देऊन खरे कोरोना योध्दा ठरलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनी रक्तदानातही सेंच्युरी मारली. सेवाभावाने राष्ट्रीय कर्तव्यातही उत्साही पुढाकार घेतला.
लोकमत व राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोशिएशन (इंटक )च्या वतीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १०१ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. विजय जोशी, डागा रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ. रवींद्र पांडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, संघटनेचे पदाधिकारी ईश्वर मेश्राम, संजय मोहले, बाबाराव श्रीखंडे, मिलिंद चकोले, संजय गाटकिने, पुरुषोत्तम कैकाडे, बळीराम शेंडे, अभय अप्पनवार, योगेश बोरकर,सुषमा नायडू, सुषमा धोरे, यमराज शिंदेकर, राजू मालोकर, प्रफुल्ल टिंगणे, गौतम पाटील, अरुण तुर्केल प्रामुख्याने उपस्थित होते.
तानाजी वनवे, जलज शर्मा व संजय निपाणे यांनी उद्घाटन प्रसंगी भाषणातून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. रक्तदान म्हणजे जीवनदान, आपण दिलेल्या रक्तामुळे रुग्णांचा जीव वाचण्यासाठी मदत होणार असल्याने हे राष्ट्रीय सेवा कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
...
स्वत: हून पुढाकार
अनेक कर्मचाऱ्यांना रक्तदानाची माहिती मिळताच त्यांनी कामकाजातून वेळ काढून स्वत: रक्तदानासाठी पुढे आले. यात सफाई कर्मचारीही मागे नव्हते. मनपाच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांत रक्तदानाचा उत्साह होता.
.......
रक्तदानासाठी आयुक्तांचे प्रोत्साहन
रक्तदानासाठी कर्मचाऱ्यांतील उत्साह कौतुकास्पद होता. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी या उपक्रमाला सहकार्य करीत कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. रक्तदानासाठी मनपा मुख्यालयातत परवानगी देत सहकार्य केल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह व्दिगुणित झाला.
......
झोनमधील कर्मचारी रक्तदानासाठी आले
रक्तदानात कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. मनपाच्या दहा झोनमधून कर्मचारी रक्तदानासाठी आले होते. यासाठी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांची रीतसर परवानगी घेतली. अधिकाऱ्यांनीही त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.