सीजीएसटी नागपूर झोनला २३ टक्के वाढीसह मिळाला २०,८०६ कोटींचा महसूल
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 13, 2024 02:22 PM2024-04-13T14:22:01+5:302024-04-13T14:22:16+5:30
तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे. नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला.
नागपूर : सीजीएसटीच्यानागपूर झोनचे प्रधान मुख्य आयुक्त के.सी. जॉनी यांच्या नेतृत्त्वात कार्यरत नागपूर-१, नागपूर-२, औरंगाबाद आणि नाशिक विभागाला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २० हजार ८०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १६ हजार ९०९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
तुलनात्मकरीत्या महसुलात ३,८९७ कोटी अर्थात २३ टक्के वाढीची नोंद झाली आहे.
नागपूर झोनच्या चार आयुक्तालयात नागपूर-२ मध्ये सर्वाधिक महसूल वेस्टर्न कोलफिल्डकडून मिळाला. या विभागाला आर्थिक वर्ष २२-२३ च्या ५,०४१ कोटींच्या तुलनेत ५,९१४ कोटी (२८ टक्के वाढ) महसूल प्राप्त झाला. नागपूर-१ मध्ये ४,०८२ कोटींच्या तुलनेत ५,२३९ कोटी (१७.३ टक्के), नाशिकला ४,२७७ कोटींच्या तुलनेत ५,४७९ कोटी (२८.१ टक्के) आणि औरंगाबाद विभागाला ३५०० कोटींच्या तुलनेत ४,१७४ कोटी रुपये (२८.१ टक्के वाढ) महसूल मिळाला.
सीजीएसटी विभागाला मिळालेला महसूल
महिना वर्ष २२-२३ वर्ष २३-२४ टक्के वाढ
एप्रिल १७०१ २००९ १८.१०
मे १४८९ १७८९ १९.१०
जून १४३० १७५४ २०.२०
जुलै १४०१ १७१६ २०.७०
ऑगस्ट ११८१ १५१६ २२.००
सप्टें ११६७ १५३८ २३.३०
ऑक्टोबर १२७४ १४८२ २२.४०
नोव्हें १२०० १६९८ २४.५०
डिसेंबर १३३६ १६०३ २४.००
जानेवारी १५३७ १७७६ २३.१०
फेब्रुवारी १५९३ १९३५ २२.९०
मार्च १६०० १९९० २४.००
एकूण १६९०९ २०८०६ २३.००