दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:58+5:302021-06-01T04:07:58+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चाैघांना अटक करण्यात वाडी पाेलिसांना यश आले. यातील एक आराेपी ...

Chaighe arrested in preparation for the robbery | दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चाैघांना अटक करण्यात वाडी पाेलिसांना यश आले. यातील एक आराेपी पळून गेल्याने त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली असून, अटकेतील आराेपींकडून एकूण ५० हजार ६३० रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. ही कारवाई वाडी परिसरात शनिवारी (दि. २९) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

शुभम चरणदास मेंढे (२६, रा. पालकरनगर, वाडी), नीलेश ऊर्फ छोटू ज्ञानेश्वर गवई (२७, रा. रामजी आंबेडकरनगर वाडी), सूरज ऊर्फ रघू सुभाष भलावी (१९, रा. म्हाडा कॉलनी, आठवा मैल) व निखिल विजय कांबळे असे अटक करण्यात आलेल्या तर रोशन नायडू (रा. आंबेडकरनगर, वाडी) असे पसार आराेपीचे नाव आहे. हे पाचही जण वाडी परिसरातील एका हाॅटेलच्या मागे असलेल्या माेकळ्या जागेवर दबा धरून बसले हाेते.

त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे काहींनी त्यांच्याबाबत पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच ते ठिकाण गाठून सापळा रचला व शिताफीने चाैघांना ताब्यात घेतले. या धावपळीत अंधाराचा फायदा घेत एकाने पळ काढला. पाेलिसांनी चारही जणांना अटक करीत त्यांच्याकडून तलवार, चाकू, लोखंडी रॉड, मिरची पावडर, लाकडी दांडा, नायलॉन दोरी, माेटारसायकल, मोबाइल हॅण्डसेट व २५० रुपये राेख असा एकूण ५० हजार ६३० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

पसार आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक भरत वऱ्हाडे, उपनिरीक्षक साजिद अहमद, हवालदार सुनील मस्के, प्रमोद गिरी, ईश्वर राठोड, हेमराज बेरार यांच्या पथकाने केली.

===Photopath===

310521\img_20210531_144029.jpg

===Caption===

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Web Title: Chaighe arrested in preparation for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.