दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:24+5:302021-09-02T04:17:24+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : पाेलिसांच्या पथकाने सावनेर-काटाेल मार्गावरील माेहपा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये ...

Chaighe arrested in preparation for the robbery | दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

दराेड्याच्या तयारीतील चाैघे अटकेत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : पाेलिसांच्या पथकाने सावनेर-काटाेल मार्गावरील माेहपा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये दराेड्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल चाेरट्यांना अटक केली, तर एक चाेरटा पळून गेला. त्यांच्याकडून दराेड्यासाठी आवश्यक असलेली साधने जप्त करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.

दिनेश जनबाजी आडमाची (२९), बन्सीधर ऊर्फ बन्सी रेवालाल वरठी (२६) दोघेही रा. यशवंतबाबा झोपडपट्टी, सावनेर, सुरेश ऊर्फ डोमा पांडुरंग नारनवरे (२९, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) व रामराव भय्याजी भोयर, रा. जुना धान्यगंज, सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या तर मोंटू रामचंद्र बारई, रा. यशवंतबाबा झोपडपट्टी, सावनेर असे पसार असलेल्या दराेडेखाेराचे नाव आहे.

सावनेर पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना हे पाचही जण सावनेर-काटाेल मार्गावरील माेहपा फाटा परिसरात फिरत असल्याचे आढळून आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने या पथकाने सापळा रचला. मात्र, पाेलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्ना केला. यात चाैघांना पकडण्यात पाेलिसांना यश आले असून, धावपळीत अंधाराचा फायदा घेत माेंटू माेटरसायकलने पळून गेला.

त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार मारुती मुळूक यांनी व्यक्त केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३९९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे करीत आहेत. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

...

सर्वांना न्यायालयीन काेठडी

अटक करण्यात आलेल्या चारही दराेडेखाेरांना साेमवारी (दि. ३०) सावनेर शहरातील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावल्याने चाैघांचीही नागपूर शहरातील मध्यवर्ती तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिरची पावडर, दोर व लोखंडी रॉड आदी साहित्य जप्त केले आहे. पसार असलेल्या माेंटू बारई यास लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी दिली.

Web Title: Chaighe arrested in preparation for the robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.