कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे नागपुरात आजपासून साखळी उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 12:34 IST2023-09-12T11:46:45+5:302023-09-12T12:34:45+5:30
माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची कुणबी-ओबीसी आंदोलनाला भेट

कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे नागपुरात आजपासून साखळी उपोषण
नागपूर : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीने संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. समितीने हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार करीत मंगळवारपासून साखळी उपोषण करण्याची घोषणा केली. यानंतरही सरकारने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे सरकारने लेखी द्यावे, त्यानंतरच हे आंदोलन थांबविण्यावर विचार करू, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
विविध संघटनांचा पाठिंबा
आंदोलनाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, भाजपचे माजी जि. प. सदस्य अनिल निदान, अजय बोढारे, माजी सभापती प्रकाश टेकाडे आदींनी भेट दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघ, संविधान बचाव कृती समितीचे अरुण वणकर, अॅड, पुरुषोत्तम पाटील, संविधान व लोकशाही बचाव परिषद, जिल्हा वकील संघटनेचे माजी सचिव अॅड. नितीन देशमुख आदींनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.