नागपूर मनपा विशेष समित्यांच्या सभापती, उपसभापतींची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:27 AM2018-03-07T00:27:34+5:302018-03-07T00:27:44+5:30
नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभापती, उपसभापतींची घोषणा करून सर्वांचे स्वागत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतील १० विशेष समित्यांची निवडणूक मंगळवारी महापालिक मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापतीर्ची निवड अविरोध झाली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी निवड झालेल्या सभापती, उपसभापतींची घोषणा करून सर्वांचे स्वागत केले.
निवडणूक प्रक्रियेनंतर सत्तापक्ष नेता कार्यालयात सर्व विशेष समिती सभापती, उपसभापतींचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपनेते बाल्या बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
सर्व नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींनी आता जोमाने कामाला लागून मिळालेल्या संधीचे सोने करा, असे आवाहन नंदा जिचकार यांनी केले. संदीप जोशी म्हणाले, नव्या विशेष समित्यांमध्ये नव्या आणि जुन्या चेहºयांची सांगड घालण्यात आली आहे. सर्वांनी सात दिवसांच्या आत पदभार सांभाळून तातडीने कामाला लागा. प्रत्येक समितीच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या कर वसुलीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन केले. स्वागत समारंभाचे संचालन महापालिकेतील उपनेते बाल्या बोरकर यांनी केले.
अशा आहेत विशेष समित्या
स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती : संजय बंगाले (सभापती), किशोर वानखेडे (उपसभापती), सदस्य - भगवान मेंढे, राजकुमार साहू, पल्लवी श्यामकुळे, सरिता कावरे, कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे, जितेंद्र घोडेस्वार.
वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती : मनोज चापले (सभापती), विजय चुटेले (उपसभापती), सदस्य - प्रमोद कौरती, लखन येरवार, विशाखा बांते, ज्योती भिसीकर, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर.
विधी विशेष समिती : अॅड. धर्मपाल मेश्राम (सभापती), संगीता गिºहे (उपसभापती), सदस्य - जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, गोपीचंद कुमरे, समिता चकोले, संदीप सहारे, भुट्टो जुल्फेकार अहमद, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहिम.
शिक्षण विशेष समिती : प्रा. दिलीप दिवे (सभापती), भारती बुंडे (उपसभापती), सदस्य - रिता मुळे, स्वाती आखतकर, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मथरानी, मनोजकुमार गावंडे, नितीन साठवणे, मो. इब्राहिम तौफिक अहमद.