गोंड गोवारींच्या निवेदनावरील अभ्यास समितीचे अध्यक्ष न्या. के. एल. वडणे विदर्भ दौऱ्यावर

By आनंद डेकाटे | Published: July 5, 2024 05:07 PM2024-07-05T17:07:34+5:302024-07-05T17:10:05+5:30

Nagpur : १५ व १६ जुलै रोजी समितीतर्फे स्विकारली जातील लेखी निवेदने

Chairman of the study committee on Gond Gowari's K. L. Vadne is on Vidarbha tour | गोंड गोवारींच्या निवेदनावरील अभ्यास समितीचे अध्यक्ष न्या. के. एल. वडणे विदर्भ दौऱ्यावर

Chairman of the study committee on Gond Gowari's K. L. Vadne is on Vidarbha tour

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गोंड गोवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष न्या. वडणे हे १४ ते २० जुलै या कालावधीत विदर्भ दौऱ्यावर आहेत.

नागपूर महसूल विभागातील गोंड गोवारी समाजाचे प्रतिनिधी १५ व १६ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत लेखी निवेदन सादर करुन शकतील. यावेळेत समितीपुढे संघटनेतील प्रतिनिधीला आपले म्हणने थोडक्यात मांडण्यासाठी संधी दिली जाईल. १८ ते २० जुलै रोजी समितीचा दौरा अमरावती येथे आहे. अमरावती विभागातील संघटनेच्या प्रतिनिधींना सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत नमूद तारखांना शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आपले लेखी निवेदन सादर करता येतील.

निवेदन टंकलिखीत व वाचनीय असणे आवश्यक असून गोंड गोवारी संघटनेतील प्रतिनिधींना थोडक्यात आपली बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात येईल.

Web Title: Chairman of the study committee on Gond Gowari's K. L. Vadne is on Vidarbha tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.