तिसऱ्या दिवशी मिळाला चाैथा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:57+5:302021-09-08T04:12:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : अम्मा का दर्गा लगतच्या कन्हान नदीत बुडालेल्या पाच तरुणांपैकी चाैघांचे मृतदेह शाेधण्यात एसडीआरएफच्या जवानांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : अम्मा का दर्गा लगतच्या कन्हान नदीत बुडालेल्या पाच तरुणांपैकी चाैघांचे मृतदेह शाेधण्यात एसडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. शाेधकार्याच्या तिसऱ्या दिवशी (मंगळवार, दि. ७) या जवानांना एकाचा मृतदेह मिळाला असून, पहिल्या दिवशी (दि. ५) एक तर दुसऱ्या दिवशी (साेमवार, दि. ६) दाेन मृतदेह त्यांनी हुडूकन काढले हाेते. ही घटना रविवारी (दि. ५) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली हाेती.
जुनी कामठी (ता. पारशिवनी) येथील अम्मा का दर्गा लगत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील सय्यद अरबाज उर्फ लकी (२२,) अय्याज बेग हाफीज बेग (२०), शेख अबुजर शेख अलताफ (१८), ख्वाजा बेग कालू बेग (१७) व शेख सबतैयन शेख इकबाल (२१)हे पाच तरुण बुडाले हाेते. यातील ख्वाजा बेग कालू बेग याचा मृतदेह रविवारी दुपारी घटनास्थळापासून २५० मीटरवर आढळून आला हाेता. सय्यद अरबाज व शेख सबतैयन शेख इकबाल या दाेघांचे मृतदेह साेमवारी उनगाव (ता. कामठी) शिवारात आढळून आले.
दरम्यान, मंगळवारी सकाळी एसडीआरएफच्या जवानांनी शाेधकार्यास सुरुवात केली. या जवानांना सिहाेरा (ता. पारशिवनी) परिसरात सकाळी शेख अबुजर शेख अलताफ याचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या जवानांनी दिवसभर माैदा शहरापर्यंत शाेधकार्य केले. मात्र, अय्याज बेग हाफीज बेग याला शाेधण्यात त्यांना अद्यापही यश आले नाही.
अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले असून, बुधवारी (दि. ८) सकाळी शाेधकार्याला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांंत सांगडे, उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान व एसडीआरएफचे पीएम प्रकाश नेमाने यांनी संयुक्तरीत्या दिली.