शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही चक्का जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 02:40 PM2021-02-06T14:40:27+5:302021-02-06T15:10:16+5:30
Nagpur News दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही आंदोलन करण्यात आले. इंदोरा चौकातही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ नागपुरातही आंदोलन करण्यात आले. इंदोरा चौकातही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. कामठी रोड जाम झाल्याने वाहतूक वळवण्यात आली.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दुपारी २ वाजेपासून इंदोरा चौकात रास्ता रोको आंदोन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना गैरसोय होऊ नये म्हणून या रस्त्यावरील वाहतुकी वळविण्यात आली होती. कामठी रोड व आटोमोटिव्ह चौकाकडून येणारी वाहने ही थेट इंदोरा चौकाकडे न येतो ती ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्गे वळविण्यात आली.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार संविधान चौकातही विविध संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांवर पोलीस अत्याचार बंद करा, किसान विरोधी शेतकरी कायदे वापस घ्या , तसेच शेतीमध्ये सरकारी गुंतवणूक वाढवा व शेती उद्योगपतींच्या हवाली करणे बंद करा या मागण्या प्रदर्शनाद्वारे करण्यात आल्या.
आंदोलनात अरुण लाटकर, मनोहर मुळे, रामेश्वर चरपे मधुकर भरणे मोहम्मद ताजुद्दिन दिलीप देशपांडे विलास जांभूळकर सुभाष रामटेके विजया जांभुळकर, स्नेहलता जांभूळकर वैशाली केडिया एडवोकेट विजय फुलकर यांच्यासह विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.