नागपुरातील सात महिन्याच्या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:08 AM2020-04-21T00:08:31+5:302020-04-21T00:09:42+5:30

आई-वडिलांचे नमुने पॉझिटिव्ह तर सात महिन्याच्या चिमुकल्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आई-वडील सोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून पेलत आहे.

The challenge of keeping a seven-month-old baby free from coronation in Nagpur | नागपुरातील सात महिन्याच्या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान

नागपुरातील सात महिन्याच्या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान

Next
ठळक मुद्देमेडिकलचे विशेष लक्ष : डॉक्टर, परिचारिका बनल्या आई, दूध पाजण्यासह घेताहेत काळजी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आई-वडिलांचे नमुने पॉझिटिव्ह तर सात महिन्याच्या चिमुकल्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने या बाळाला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान आई-वडील सोबतच डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी गेल्या १३ दिवसांपासून पेलत आहे. दूध पाजण्यापासून ते इतरही काळजी घेतली जात आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे. सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित ६८ वर्षीय मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करणे सुरूच आहे. सुरुवातीला मृताच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला आणि सात महिन्यांच्या चिमुकल्याला मेडिकलमध्ये सहा एप्रिल रोजी दाखल केले. या सर्वांचे नमुने तपासले असता आई-वडील पॉझिटिव्ह आले, तर चिमुकला निगेटिव्ह आला. या तिघांना मेडिकलच्या पेर्इंग वॉर्डात दाखल केले. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी बाळाला नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यास सांगितले, परंतु जवळचे सर्वच नातेवाईक पॉझिटिव्ह येत असल्याने त्यांनी नकार दिला. आईचे दूध वाटीत काढून दुसºया कोणाकडून बाळाला चमच्याने पाजण्याचा दुसरा पर्याय डॉक्टरांनी सुचविला, परंतु आईने नकार दिला. शेवटी आईनेच बाळाला दूध पाजताना विशेष काळजी घेण्याचा पर्याय समोर आला. दूध पाजण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क बांधणे व इतरही प्रतिबंधात्मक उपाय डॉक्टरांनी सुचविले. त्यानुसार आई-वडील खबरदारी घेत आहेत. विशेष म्हणजे, इतर वेळी डॉक्टर, परिचारिका बाळाचा सांभाळ करीत आहेत. या बाळाचे नमुने २४ तासानंतर तपासणीसाठी पाठविले जात आहेत. बाळाच्या प्रकृतीकडे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन तर आई-वडिलांच्या प्रकृतीकडे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. राजेश गोसावी व त्यांची चमू लक्ष ठेवून आहेत.
पसर्नल हायजीनकडे विशेष लक्ष
आईच्या दूधातून कोरोना होत नाही, असे आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आले आहे. परंतु बाळाला दूध पाजताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. जसे हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क बांधणे व या शिवाय, पसर्नल हायजीन फार महत्त्वाची आहे. बाळाच्या व दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीकडे मेडिसीन व पेडियाट्रिक विभाग लक्ष ठेवून आहे.
डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

Web Title: The challenge of keeping a seven-month-old baby free from coronation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.