चाणक्यने कूटनीतीचा वापर जनकल्याणासाठी केला

By admin | Published: January 14, 2015 12:42 AM2015-01-14T00:42:29+5:302015-01-14T00:42:29+5:30

प्रखर बुद्धिमत्ता असलेले चाणक्य अनेक शास्त्रात पारंगत होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर व संघटन कौशल्याच्या बळावर नंद राजाची सत्ता उलथून टाकली. आपल्या कौटिल्य नीतीचा वापर

Chanakya used diplomacy for public purposes | चाणक्यने कूटनीतीचा वापर जनकल्याणासाठी केला

चाणक्यने कूटनीतीचा वापर जनकल्याणासाठी केला

Next

चारुदत्त आफळे : कीर्तन महोत्सवाचा समारोप
नागपूर : प्रखर बुद्धिमत्ता असलेले चाणक्य अनेक शास्त्रात पारंगत होते. त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर व संघटन कौशल्याच्या बळावर नंद राजाची सत्ता उलथून टाकली. आपल्या कौटिल्य नीतीचा वापर दुष्टांचा संहार करण्यासाठी केल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तन महोत्सवात आर्य चाणक्यांचे जीवन चरित्र साकारताना केले.
कीर्तन महोत्सव आयोजन समिती व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणीस पार्कवर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात चारुदत्त आफळे यांनी आज पाचवे आणि अंतिम पुष्प गुंफले. त्यांनी कीर्तनातून चाणक्यच्या बुद्धिमत्तेचा व संघटन कौशल्याचा परिचय करून दिला. आर्य चाणक्यांच्या वडिलांचा मित्र मगध राजाचा महामंत्री होता. धनानंद राजाचा घोटाळा त्याने उघडकीस आणला होता. त्यामुळे धनानंद राजाने महामंत्र्याला तुरुंगात डांबले. चाणक्याचे वडील कपिल देव यांनी त्याविरोधात आंदोलन केले. राजाने आंदोलन चिरडण्यासाठी कपिल देव यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. नंतर त्यांची हत्या केली. जीव वाचलेल्या विष्णू गुप्त ऊर्फ चाणक्य विद्याअध्ययनासाठी तक्षशिला येथे गेले.
विष्णू गुप्तांचे पूर्वज चणक ऋषी कुळातील होते. त्यामुळे त्यांचे नाव चाणक्य पडले. चाणक्यांनी अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, आयुर्वेद व राज्यशास्त्राची पदवी मिळविली. चाणक्यांना धर्मदाय आयुक्त म्हणून काम मिळाले. चाणक्यपासून आपल्याला धोका आहे, हे ओळखुन नंदराजाने त्यांचा भरसभेत अपमान करून घालवून दिले. त्याचा प्रतिशोध तसेच वडिलांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी त्यांनी चंद्रगुप्ताला राजा बनविले. संघटन व बुद्धिमत्ता असलेल्या चाणक्यनी आपल्या ज्ञानाचा वापर करून नंदराजाची राजवट घालविली व ग्रीकांनाही हुसकावून लावले.
कीर्तन महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. दत्ता मेघे, आ. सुधाकर देशमुख, रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक राम हरकरे, विजय काशीकर, ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. आजची आरती सुनील काशीकर व शिरीष पुरोहित यांच्याहस्ते संपन्न झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Chanakya used diplomacy for public purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.