विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:08+5:302021-06-09T04:09:08+5:30
नागपूर : हवामान विभागाने ८ जूनपासून विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविली आहे. ९ जूननंतर दाट पावसाची शक्यता वर्तविली असल्याने ...
नागपूर : हवामान विभागाने ८ जूनपासून विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविली आहे. ९ जूननंतर दाट पावसाची शक्यता वर्तविली असल्याने यंदा मृग प्रारंभापासूनच बरसणार, असे संकेत आहेत.
मागील आठवड्यापासूनच विदर्भात काही ठिकाणी कमीअधिक पाऊस पडत आहे. यामुळे नवतपाच्या काळातही तापमान ४१ च्यावर पोहोचले नाही. सोमवारीही विदर्भातील तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या आतच होते. नागपुरातील तापमानाचा पारा ३९.५ अंशावर होता. कालच्यापेक्षा तापमानामध्ये ०.६ अंशाने घट दर्शविण्यात आली. असे असले तरी दुपारी कडक उन्ह पडले. आकाश ढगाळलेले नसले तरी, दुपारनंतर ऊनसावलीचा खेळ सुरू होता. शहरात सकाळी आर्द्रता ६० टक्के होती. ती सायंकाळी ४० टक्क्यांपर्यंत घसरली.
विदर्भात मागील २४ तासात अकोलामध्ये चांगला पाऊस झाला. तिथे ३५.५ मिमी तर, अमरावतीमध्ये २.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. सोमवारी विदर्भात बुलडाणामध्ये सर्वात कमी ३४.४ अंश सेल्सिअस तापमान होते. तर वर्धामध्ये पारा ४०.१ वर होता. अन्य ठिकाणचे तापमानही अंशत: खालावले होते.
...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३७ : २३.४
अमरावती : ३५.६ : २३.७
बुलडाणा : ३४.४ : २४.०
चंद्रपूर : ३६.६ : २५.८
गडचिरोली : ३७.० : २६.४
गोंदिया : ३७.५ : २३.८
नागपूर : ३९.५ : २६.८
वर्धा : ४०.१ : २६.३
वाशिम : ३४.० : २०.२
यवतमाळ : ३७.९ : अप्राप्त
...