नागपुरात पावसाची शक्यता : तापमान घटल्याने वाढली थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:26 PM2020-11-24T23:26:43+5:302020-11-24T23:28:31+5:30
Chance of rain , nagpur news तापमान कमी झाल्याने नागपुरात थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. मात्र गेल्या २४ तासात तापमानात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. पारा सामान्य स्तरावर असूनही दिवसा आणि रात्री थंडी जाणवायला लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारपर्यंत नागपुरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात थोडा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तापमान कमी झाल्याने नागपुरात थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. मात्र गेल्या २४ तासात तापमानात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. पारा सामान्य स्तरावर असूनही दिवसा आणि रात्री थंडी जाणवायला लागली आहे. दरम्यान, हवामान खात्याने गुरुवारपर्यंत नागपुरात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सोबतच विदर्भातील काही जिल्ह्यात थोडा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दक्षिणेकडील राज्यात जोरदार पाऊस होण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे. याचा प्रभाव मध्य भारतावर पडण्याची चिन्हे नाहीत. मात्र येत्या दोन दिवसात नागपूरसह विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे.
नागपुरात दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. रात्रीचे तापमान १३.५ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले जे सामान्यपेक्षा एका अंशाने कमी आहे. गेल्या २४ तासात रात्रीच्या तापमानात ०.९ डिग्रीची वाढ नोंदविण्यात आली. मात्र रात्री थंडीची हुडहुडी जाणवत आहे. दोन दिवसात पाऊस झाला तर तापमान दोन अंशाने वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वात कमी ११.६ डिग्री तापमान गोंदियात नोंदविण्यात आले.