चंद्रपूर ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:42 PM2018-04-30T23:42:14+5:302018-04-30T23:42:33+5:30
यंदा एप्रिलमध्येत उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मोसमातील पाऱ्याने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चंद्रपूरचे तापमान ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात ०.४ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक ऊन असते परंतु यंदा एप्रिलमध्येच ४६.८ डिग्रीसह पूर्ण मध्य भारतात चंद्रपूर हे सर्वाधिक गरम राहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा एप्रिलमध्येत उन्हाचे चटके जाणवायला लागले आहे. महिन्याच्या शेवटच्या दिवशीच मोसमातील पाऱ्याने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चंद्रपूरचे तापमान ४६.८ तर नागपूर ४५.६ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात ०.४ डिग्री सेल्सिअसची वाढ झाली आहे. विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक ऊन असते परंतु यंदा एप्रिलमध्येच ४६.८ डिग्रीसह पूर्ण मध्य भारतात चंद्रपूर हे सर्वाधिक गरम राहिले.
हवामान विभागाच्या सूत्रानुसार मे महिन्यातील पारा ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो. सोमवारी शहरात ढग दाटू आले होते. परंतु तापमानावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. रात्रीच्या वेळी मात्र तापमान १.३ डिग्रीने खाली घसरले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता गरम हवा होती. दुपारी ती आणखी तीव्र झाली. दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत उन्हाचे चटके जाणवायला लागले होते. परिणामी दुपारच्या वेळी शहरातील बहुतांश रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. विदर्भात चंद्रपूरनंतर ब्रम्हपुरी दुसºया स्थानावर राहिले. येथे ४६ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वर्धा ४५ डिग्री, गडचिरोली ४४.८ डिग्री, यवतमाळ ४४.५ डिग्री, अमरावती ४४.५, वर्धा ४५ डिग्री, बुलडाणा ४० डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
दुपारी बाहेर पडणे टाळा
पारा सामान्यपेक्षा तीन डिग्री वर पोहोचला आहे. येत्या आठवडाभर अधिक ऊन राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, अशी सूचना मनपाच्या आरोग्य विभागाने केली आहे. बाहेर जाणे आवश्यकच असेल तर शरीराला पूर्णपणे झाकून बाहेर पडावे. हेल्मेट घालावे. उन्हापासून चेहºयाचे संरक्षण करावे असेही कळविले आहे.