नागपूरचे चंद्रशेखर मेश्राम वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:44 AM2018-06-02T10:44:14+5:302018-06-02T10:44:22+5:30
मध्यभारतातील प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) वैद्यकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यभारतातील प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) वैद्यकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर डॉ. मेश्राम हे जगातील सात सदस्यांपैकी एक आणि भारतातील एकमेव मेंदूरोग तज्ज्ञ आहेत. ‘डब्ल्यूएफएन’ ही जगातील मेंदूरोग तज्ज्ञांची एकमेव असलेली उच्चस्तरीय संघटना आहे. यात १२० देशातील सदस्यांचा समावेश आहे. या समितीवर काम करण्याचा डॉ. मेश्राम यांच्याकडे चार वर्षांचा अनुभव आहे. ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे ते अध्यक्षही आहेत. भारतीय न्यूरोलॉजीच्या इतिहासात जागतिकस्तरावर एकाचवेळी तीन पदांवर कार्य करणारे डॉ. मेश्राम पहिले भारतीय मेंदूरोगतज्ज्ञ ठरले आहेत. मागील तीन वर्षांपासून ते राष्ट्रीय मेंदू सप्ताहाचे राष्ट्रीय संयोजक असून त्यांनी देशभरात मेंदूरोगाविषयी जनजागरण करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरचे डॉ. मेश्राम हे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसडर’ आहेत.