चंद्रशेखर मेश्राम जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजी समितीच्या अध्यक्षपदी
By Admin | Published: March 28, 2017 01:52 AM2017-03-28T01:52:33+5:302017-03-28T01:52:33+5:30
प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची जागतिक फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी ट्रॉपीकल न्यूरोलॉजी समितीवर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नागपूर : प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची जागतिक फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी ट्रॉपीकल न्यूरोलॉजी समितीवर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. राड शकीर यांनी मुंबई येथे आयोजित जागतिक ट्रॉपीकल न्यूरोलॉजी परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात केली. या समितीचे सचिव डॉ. अमिल्टॉन बरेरा हे आहेत. नुकतेच मुंबई येथे झालेल्या न्यूरोलॉजी परिषदेचे डॉ. मेश्राम हे आयोजन सचिव होते. परिषदेत हजारावर प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या वैज्ञानिक समितीचे डॉ. मेश्राम हे एकमेव भारतीय सदस्य आहेत. जागतिक न्यूरोलॉजी परिषदेमध्ये वैज्ञानिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आखण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. यापूर्वी डॉ. मेश्राम यांनी ‘डब्ल्यूएफएन’च्या संविधान समितीवर चार वर्षे कार्य केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते मेंदू सप्ताहाच्या माध्यमातून लोकांमध्ये मेंदू आजाराविषयी माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. (प्रतिनिधी)