हायकोर्टाच्या रोस्टरमध्ये बदल
By admin | Published: August 17, 2015 02:57 AM2015-08-17T02:57:14+5:302015-08-17T02:57:14+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत बदल करण्यात आला आहे.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील रोस्टरमध्ये नियमित प्रक्रियेंतर्गत बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टर १७ आॅगस्टपासून लागू होणार आहे. त्यानुसार ३० आॅगस्टपर्यंत नागपूर खंडपीठात चार द्विसदस्यीय न्यायपीठे कार्यरत राहणार आहेत. यानंतर एक द्विसदस्यीय न्यायपीठ औरंगाबाद खंडपीठात जाणार आहे.
नवीन रोस्टरनुसार न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांच्याकडे जनहित याचिका, सर्व लेटर्स पेटेंट अपील्स व अन्य न्यायपीठाला न दिलेली फौजदारी प्रकरणे, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याकडे अन्य न्यायपीठाला न दिलेल्या दिवाणी रिट याचिका व सर्व फर्स्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व ए. आय. एस. चिमा यांच्याकडे १९९८ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २०००, २००२, २००४, २००६ ते २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका व सर्व कौटुंबिक न्यायालय अपील्स तर, न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व इंदिरा जैन यांच्याकडे २०१० पर्यंतच्या फौजदारी अपील्सची जबाबदारी देण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व इंदिरा जैन हे ३० आॅगस्टपर्यंतच नागपूर खंडपीठात असून ३१ आॅगस्टपासून ते औरंगाबाद खंडपीठात कार्य करणार आहेत.
एकल न्यायपीठांपैकी न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे सर्व सेकंड अपील्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज, किरकोळ दिवाणी अर्ज व दिवाणी अवमानना संदर्भ, न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्याकडे २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे २००० पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२ व २०१४ मधील दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्याकडे सर्व फर्स्ट अपील तर, न्यायमूर्ती विनय देशपांडे यांच्याकडे सर्व फौजदारी प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रत्येक गुरुवारी जुन्या प्रकरणांवर अंतिम सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)