प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:23 PM2020-07-01T21:23:20+5:302020-07-01T21:27:43+5:30

आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Change is possible through progressive farmers: Devendra Fadnavis | प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : देवेंद्र फडणवीस

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून परिवर्तन शक्य : देवेंद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देवसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजदेखील शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत व ते अडचणींचा सामना करत आहेत. मात्र समाजात अनेक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरीदेखील आहेत. अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. वनराई फाऊंडेशन व वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक प्रयोगशील शेतकरी पुरस्कारांचे बुधवारी वितरण करण्यात आले. यावेळी ते ‘ऑनलाईन’ माध्यमातून सहभागी झाले होते.


भरतनगर येथील वनराई फाऊंडेशनच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पारशिवनी तालुक्यातील रामाजी लांजेवार व त्यांच्या पत्नी शालिनी लांजेवार यांना या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. यावेळी आ. नीलय नाईक, वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, अजय पाटील, डॉ.पिनाक दंदे, नीलेश खांडेकर, वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या सचिव प्रगती पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. रामाजी लांजेवार यांनी गोमूत्र आणि शेणखताचा उपयोग करुन उत्तम शेती करता येते तसेच जैविक शेतीतून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते हे दाखवून दिले आहे, असे फडणवीस म्हणाले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना पुसदला आले की अगोदर शेतीची पाहणी करत. ते खऱ्या अर्थाने शेतीनिष्ठ नेते होते, असे नीलय नाईक यांनी सांगितले. रामाजी लांजेवार यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतीबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात गिरीश गांधी यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अजय पाटील यांनी संचालन केले तर नीलेश खांडेकर यांनी आभार मानले.

Web Title: Change is possible through progressive farmers: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.