खरीप पीक कर्जासाठी फेरफार नोंदी २४ तासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:06+5:302021-05-26T04:08:06+5:30

भिवापूर : खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतीची मशागत, खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशात सुलभ व ...

Change records for kharif crop loan within 24 hours | खरीप पीक कर्जासाठी फेरफार नोंदी २४ तासात

खरीप पीक कर्जासाठी फेरफार नोंदी २४ तासात

Next

भिवापूर : खरीप हंगाम तोंडावर आहे. शेतीची मशागत, खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. अशात सुलभ व जलद गतीने पीक कर्जाचे वितरण करा. कागदपत्रांच्या नावावर शेतकऱ्यांना घुमवाघुमवी करू नका. फेरफार नोंदी २४ तासात घ्या. अशा स्पष्ट सूचना तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी बँक व्यवस्थापक, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिल्या आहेत.

खरीप पीक कर्ज वितरणासंदर्भात तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी बँक व्यवस्थापक, मंडळ अधिकारी व तलाठी यांची नुकतीच बैठक घेतली. यात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. अशा सुलभ पद्धतीने तत्काळ कर्ज वितरणाच्या दृष्टीने संबंधितांना महत्त्वाच्या सूचना दिल्यात. यामध्ये फेरफार नोंदी घेण्यासाठी एरवी १० ते १५ दिवस लागतात. मात्र शेतीचा हंगाम असल्यामुळे ह्या नोंदी व फेरफार पास करण्याचे काम २४ तास होणार आहे. पीक कर्जासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतजमिनीचे स्वतंत्र मूल्यांकन काढावे लागत होते. यात प्रचंड वेळ जात होता. त्यामुळे आता थेट तहसील कार्यालयाच्या वतीने पीक कर्ज वितरण करणाऱ्या बँकेला प्रत्येक गावातील शेतजमिनीचे पीकनिहाय मूल्यांकन दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतंत्र मूल्यांकनाची आवश्यकता पडणार नाही. पीक कर्जासाठी लागणाऱ्या इतर कागदपत्रांबाबत खुद्द तलाठी आपल्या साजातील शेतकऱ्यांना माहिती देणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची विचारणा व जुळवाजुळवीसाठी शेतकऱ्यांना वारंवार तालुकास्थळावर येण्याचा त्रास कमी होणार आहे. या खरिपाच्या हंगामासाठी तालुक्यात आतापर्यंत ६९१ शेतकऱ्यांना ५ कोटी ६५ लाख रुपये पीक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

---

गतवर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील ३,६०० शेतकऱ्यांना ३६ कोटी ८८ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज वितरण करण्यात आले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्के पीक कर्ज वाढीचे लक्ष्यांक ठेवण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यात ४० कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. याबाबत बँक व्यवस्थापक, मंडळ अधिकारी व तलाठी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार भिवापूर

Web Title: Change records for kharif crop loan within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.