ट्रान्समिशन लाईनसाठी बदलली अंबाझरीची कॅटेगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:09+5:302020-12-16T04:27:09+5:30

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानातून जात असलेल्या हाय ट्रान्समिशन पाॅवर लाईनबाबत वनविभागाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. प्रधान वनसंरक्षक ...

Changed Ambazari category for transmission line | ट्रान्समिशन लाईनसाठी बदलली अंबाझरीची कॅटेगरी

ट्रान्समिशन लाईनसाठी बदलली अंबाझरीची कॅटेगरी

Next

नागपूर : अंबाझरी जैवविविधता उद्यानातून जात असलेल्या हाय ट्रान्समिशन पाॅवर लाईनबाबत वनविभागाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. प्रधान वनसंरक्षक अधिकारी यांनी उपवनसंरक्षकांना लिहिलेल्या पत्रातून हेच दिसून येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ए कॅटेगरीत असलेल्या उद्यानात प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण क्लिअरन्स (ईसी) गरजेचे आहे. मात्र वनविभागाच्या लेखी अंबाझरी उद्यान बी कॅटेगरीत असल्याने ईसी लागणार नाही. त्यामुळे ट्रान्समिशन लाईनचे काम राेखण्यास वनविभागाने नकार दिला आहे.

माजी वन्यजीव वार्डन जयदीप दास यांनी अंबाझरी उद्यानातून जाणाऱ्या हाय ट्रान्समिशन लाईनसाठी ईसी आवश्यक नाही का, असा प्रश्न वनविभागाला विचारला हाेता. त्यावर प्रधान वनसंरक्षक यांनी सादर केलेल्या पत्राचा उल्लेख दास यांनी केला आहे. दास यांनी याबाबत माहिती दिली. वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत तसेच २००६ च्या पर्यावरण परिणाम मूल्यांकाच्या परिपत्रकानुसार आणि केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बी कॅटेगरीच्या जागेवर प्रकल्प उभारण्यासाठी ईसी घेण्याची गरज नाही. मात्र तलाव, संरक्षित जंगल किंवा प्रवासी पक्ष्यांचा अधिवास असेल तर ती जागा ए कॅटेगरीत गणल्या जाईल. यानुसार अंबाझरी जैवविविधता पार्क हे ए कॅटेगरीत गणल्या जाईल. असे असताना वनविभाग मात्र आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचेही निर्देश

एमएसटीसीएलने ट्रान्समिशन लाईनसाठी ९०० झाडे ताेडण्याची परवानगी मागितली हाेती आणि ऑगस्ट २०१३ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने परवानगीही दिली हाेती. त्यामुळे वनविभागाने ट्रान्समिशन लाईनचे काम थांबविण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र झाडांचे कमीतकमी नुकसान हाेईल आणि याच भागात वृक्षाराेपण करता येईल, यासाठी भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्याकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा तसेच एफडीसीएम किंवा ट्राॅपिकल फाॅरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (टीएफआरआय), जबलपूर येथील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच काम सुरू करण्याची सूचनासुद्धा एमएसटीसीएलला केली आहे.

Web Title: Changed Ambazari category for transmission line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.