आमदार निवासातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्यांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:58 PM2020-04-14T22:58:54+5:302020-04-14T22:59:52+5:30

सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे.

Chaos of issues at the Quarantine Center in MLA hostel | आमदार निवासातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्यांचा गोंधळ

आमदार निवासातील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्यांचा गोंधळ

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयिताचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसापासून नागपुरात क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत असलेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यातच सिव्हिल लाईन्स येथे आमदार निवासात तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरसंबंधात एका संशयिताने व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसारित करताच प्रशासनामध्ये गोंधळ उडालेला आहे. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये समस्याच समस्या असल्याचे व्हिडिओत सांगण्यात आले आहे.
संबंधित संशयित हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो १५ मार्च रोजी दिल्लीला गेला होता. १७ मार्चला दिल्लीवरून तो नागपूरला परतला. विमानातून उतरल्यानंतर नागपूर विमानतळवार त्याची ना स्क्रिनिंग झाली ना त्याची चौकशी करण्यात आली. त्यामुळे तो टॅक्सीने घरी निघून गेला. ३१ मार्च रोजी मनपाच्या सतरंजीपुरा झोनमधून त्याला फोन आला आणि कोरोनाची टेस्ट करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार रात्री उशिरा त्याला आमदार निवासात नेण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याला १४ दिवस तेथेच राहण्याचे सांगण्यात आले. त्यानंतर क्वॉरंटाईनमधूनच त्याचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
प्रीकॉशन जॅकेट फेकल्या जाते
सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर आणि स्वच्छता कर्मचारी बचावासाठी म्हणून प्रीकॉशन जॅकेट घालत असतात. मात्र, काम झाल्यावर हे जॅकेट कुठलीही काळजी न घेता लॉबीच्या पायऱ्यांजवळ फेकत असल्याचे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
-----
बॉक्स...
डासांचा प्रादुर्भाव
या संशयिताने व्हिडिओमध्ये सेंटरमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव असल्याचे सांगितले आहे. याबाबत नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथील फोनवरून प्रतिसादच मिळत नाही. फोन उचलला गेला तरी तो ड्रॉप केला जात आहे. शिवाय, वागणूकही बरोबर दिली जात नसल्याची तक्रार या व्हिडिओमध्ये करण्यात आली आहे.

Web Title: Chaos of issues at the Quarantine Center in MLA hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.