चौकीदाराचा जामीन फेटाळला
By admin | Published: June 18, 2017 01:56 AM2017-06-18T01:56:54+5:302017-06-18T01:56:54+5:30
बुटीबोरी येथील होलीक्रॉस निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष
बुटीबोरी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांवरील अत्याचार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी येथील होलीक्रॉस निवासी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने आरोपी चौकीदाराचा जामीन अर्ज फेटाळून लावला. होमदेव उत्तम पडोळे (२५) रा. बामणी भंडारा, असे आरोपी चौकीदाराचे नाव आहे. होमदेवच्या अत्याचारास बळी पडलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी बाल कल्याण समितीपुढे दिलेले बयान धक्कादायक होते. हा चपराशी हा दारू पिऊन राहायचा, विद्यार्थ्यांकडून कामे करून घ्यायचा, काम केले नाही तर मारहाण करायचा, त्यांना कोंबडा बनवायचा, एवढ्यावरच तो थांबला नव्हता तर त्याने चक्क विद्यार्थ्यांवर वारंवार लैंगिक अत्याचारही केले होते. खुद्द बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक भारती कोंडे यांनी सरकारतर्फे नोंदवलेल्या तक्रारीवरून १७ फेब्रुवारी २०१७ रोजी भादंविच्या ३७६(२)(ड)(आय)(एन), ३५४ (अ)(१), ५०६, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२)(व्ही),३(२)(व्हीए), ३(१) (डब्ल्यू)(१)(२) आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो)च्या कलम ६, १०, १७, २१ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो कारागृहात आहे. त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अजय निकोसे यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. एन. मराठे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.