तामसवाडी येथील प्राथमिक शाळेत चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:11+5:302021-08-22T04:12:11+5:30
पारशिवणी : चाेरट्याने तामसवाडी (ता. पारशिवणी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गखालीचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला व ...
पारशिवणी : चाेरट्याने तामसवाडी (ता. पारशिवणी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गखालीचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला व २२ हजार रुपये किमतीचे संगणक संच व इतर साहित्य चाेरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी उघडकीस आली.
रामदास माेजनकर (५३, रा. गायत्रीनगर, झिंगाबाई टाकळी, नागपूर) हे तामसवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नाेकरीला आहेत. ते शुक्रवारी सकाळी शाळेत गेले असता त्यांना एका वर्गखाेलीच्या दाराचे कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी त्या वर्गखालीची बारकाईने पाहणी केली असता, चाेरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यात चाेरट्याने २० हजार रुपयांचा प्राेजक्टरचा सीपीयू, एक हजार रुपयांची बॅटरी, प्रत्येकी ५०० रुपयांचा माऊस व दाेन स्पीकर असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी पारशिवणी पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार प्रभाकर झाेड करीत आहेत.