कारमधून दारूची चाेरटी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:29+5:302021-06-30T04:07:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कारमधून अवैधरीत्या देशी दारूची चाेरटी वाहतूक करणाऱ्या दाेन आराेपींना कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक केली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कारमधून अवैधरीत्या देशी दारूची चाेरटी वाहतूक करणाऱ्या दाेन आराेपींना कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २४,९६० रुपये किमतीच्या देशी दारूसह ५ लाख ७४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये प्रवीण भीमराव वंजारी (३०, रा. तेलीपुरा येरखेडा, कामठी) व खुशाल बनवारीलाल शर्मा (४०, रा. संतू हलवाई चाैक, कामठी) यांचा समावेश आहे. नवीन कामठी पाेलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना, साई मंदिर आडापूल परिसरात एमएच-४० एसी-६१७१ क्रमांकाच्या कारवर संशय आल्याने पाेलिसांनी कार थांबवून तपासणी केली. कारमध्ये देशी दारूच्या १० पेट्या आढळून आल्या. पाेलिसांनी कारमधील दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २४,९६० रुपये किमतीची देशी दारू व साडेपाच लाखाची कार असा एकूण ५ लाख ७४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, दाेघांना अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पाेलीस निरीक्षक एस. काळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुरेश कन्नाके, दिलीप कुमरे, श्रीकांत भिष्णूरकर, मंगेश गिरी, राेशन पाटील यांच्या पथकाने केली.